BJP MLA Meeting: अधिवेशनाचे सूप वाजताच भाजप 'अॅक्शन मोड'वर; जिल्हाध्यक्षानंतर आता सर्व आमदारांची बैठक

Maharashtra Politics: भाजपमध्ये पक्षांतर्गत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता
BJP MLA Meeting
BJP MLA MeetingSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपताच भाजप लगेचच कामाला लागली असून राज्यातील भाजपच्या सर्व आमदारांची १८ ऑगस्टला संघटनात्मक बैठक बोलवण्यात आली आहे. त्यामुळे भाजपमध्ये पक्षांतर्गत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटनेचा आढावा भाजप घेत असून याआधी नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची बैठक घेत महत्वाच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर आता पक्षातील सर्व आमदारांची भाजप झाडाझडती करणार असून जे आमदार पक्ष संघटनेच्या बाबतीत कमी पडले, त्यांची कान उघाडणी केली जाण्याची शक्यता आहे.

BJP MLA Meeting
Rahul Gandhi Tweet: 'आ रहा हूं...सवाल जारी रहेंगे'; राहुल गांधींना दिलासा मिळताच काँग्रेस 'अ‍ॅक्टिव्ह मोड'वर

याचाच एक भाग म्हणून मुंबईतील नरीमन पॉईंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षातील सर्व आमदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पक्ष संघटना वाढीसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे आपल्या आमदारांना कानमंत्र देणार आहेत.

BJP MLA Meeting
Mallikarjun Kharge Press Conference : 24 तासांत खासदारकी काढली; आता परत किती वेळात करणार?; मल्लिकार्जुन खर्गेंचा सवाल

काही दिवसांपूर्वीच भाजपने पक्षांतर्गत भाकरी फिरवत राज्यभरातील जिल्हाध्यक्षांच्या नव्या निवडी केल्या. यानंतर नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची बैठक घेत त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या. यानंतर भाजप आता सर्व आमदारांची बैठक घेणार असून बूथ सशक्तिकरणाचा आढावा घेणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com