पिंपरी महापालिका मुख्यालयात पुन्हा लाचखोरी : एसीबीची मोठी कारवाई

पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला आहे
Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwadsarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad : पिंपरी : गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिका मुख्यालयात स्थायी समिती कार्यालयावर एसीबीची (ACB) रेड पडली होती. त्यातून स्थायीतील लाचखोरी तथा टक्केवारीवर शिक्कामोर्तब झाले होते. बरोबर एक वर्षाने ऑगस्ट महिन्यातच पुन्हा पिंपरी पालिका मुख्यालयातच लाचखोरीचा गुन्हा आज नोंद झाला.

पालिकेच्या नगररचना व विकास विभागातील सर्व्हेअर संदीप फकीरा लबडे (वय ४८) यांना तीन लाख रुपये लाच मागितली म्हणून एसीबीने दुपारी ताब्यात घेऊन अटक केली. नंतर ‌त्यांचे घर आणि कार्यालयाची झडती घेण्यात आली. साडेतीन लाख रुपये लाच त्यांनी प्रथम मागितली. नंतर तीन लाख रुपयांवर तडजोड केली होती. मात्र, एसीबीच्या पाळतीचा सुगावा लागल्याने लबडेने लाचेसाठी तगादाच लावला नाही. परिणामी ट्रॅप झाला नाही. पण, तोपर्यंत जमा पुराव्यांच्या आधारे लाच मागितली म्हणून गुन्हा दाखल करुन एसीबीने त्यांच्यावर कारवाई केली.

Pimpri-Chinchwad
महापालिका निवडणुकांचा घोळ मिटेना ; नव्या आदेशाने इच्छुकांचा हिरमोड..

एका तरुणामुळे नगररचना विभागातील हा भ्रष्टाचार समोर आला. त्याच्या कंपनीला विकास योजना अभिप्राय देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती‌. गेल्यावर्षी पिंपरी पालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या स्थायी समितीचे भाजपचे अध्यक्ष तथा सभापती, त्यांचे पीए व स्थायी समितीचे दोन क्लार्क आणि एक शिपाई असे पाचजण एक लाख १८ हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले होते.

Pimpri-Chinchwad
Shiv Sena VS Eknath Shinde Live : शिंदे गटाला दिलासा; 12 जुलैपर्यंत अपात्रतेची कारवाई नाही...

पालिकेतील ही टक्केवारी तथा लाचखोरी ही सुद्धा पालिकेच्या एका तरुण शीख ठेकेदारामुळे उघडकीस आली होती‌. त्यांच्या मंजूर कामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी त्यांच्याकडून ही लाच घेण्यात आली होती. त्यानंतर पालिकेत मोठी खळबळ उडाली होती. तर, आजची एसीबीची कारवाई प्रशासक राजवटीत झाल्याने पुन्हा तशीच मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासक राजेश पाटील (Rajesh Patil) हे लाचखोर लबडेला निलंबित करण्याची दाट शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com