Ajit Gavhane : 'दुबई गुन्हेगारी कनेक्शन' असलेल्या कंपनीला पालिकेकडून 'स्मार्ट सिटीचं' कंत्राट, राष्ट्रवादीचा आरोप!

Ajit Gavhane : देश विघातक कार्य देखील यातून घडू शकते.
Ajit Gavhane
Ajit GavhaneSarkarnama
Published on
Updated on

Pimpari Chinchwad Corporation : थेट दुबई कनेक्शन असलेल्या गुन्हेगारांच्या कंपनीला पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केबल इंटरनेट नेटवर्क देण्याचा घाट प्रशासनामार्फत घातला असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसनकडून करण्यात आला. याच कंपनीला हे काम मिळावे, यासाठी शहरातील एका 'स्थानिक बड्या नेत्याचा' आग्रह असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.

भ्रष्टाचाराच्या खटाटोपात शहराची वाट लावण्याचा हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून, नागरिकांच्या खासगी आयुष्याशी खेळ करणाऱ्या या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. सदर निविदा त्वरित रद्द करण्यात यावे, अशी मागणी गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त व प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे केली. या मागणीची पूर्तता न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

प्रकल्प सल्लागार आणि संबंधीत कंपनीचे लागेबांधे असून ते दोघे मिळून पालिकेची फसवणूक करत आहेत. अशी देशविघातक प्रवृत्ती वेळीच ठेचायला पाहिजे,असे गव्हाणे म्हणाले. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, मुख्य प्रवक्ते योगेश बहल, प्रवक्ते विनायक रणसुभे,माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Ajit Gavhane
Danve On Raut News : राऊतांचं काही खरं नाही, आता दानवेंनीही दिला इशारा..

उद्योगनगरीत स्मार्ट सिटीत ६०० किलोमीटर लांबीचे अंडरग्राऊंड केबल इंटरनेट डक्ट तयार कऱण्यात आले आहे. तत्कालिन पालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी नवीन उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून हा प्रकल्प हाती घेतला.त्यातून भरघोस उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. यामुळे अंडरग्राऊंड केबलसाठी विविध कंपन्यांकडून वारंवार होणाऱ्या रस्ते खोदाईलाही आळा बसणार आहे. हे डक्ट भाडेपट्ट्याने देण्यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनाने सुमारे ३०० कोटी रुपयांची एक निविदा नुकतीच प्रसिध्द केली. फक्त तीन कंपन्यांनी त्यात सहभाग घेतला. त्यातील सुयोग टेलिमॅटिक्स लि.-फायबर स्टोरी कम्युनिकेशन प्रा.लि. या कंपनीची निविदा सर्वोत्कृष्ट ठरवून त्यांना काम देण्याची घाई स्मार्ट सिटी प्रशासनाकडून सुरू असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.

मात्र,या कंपनीचे दुबई कनेक्शन असलेले संचालक गुन्हेगार रियाज अब्दुल अजीज शेख आणि ड्वेन मायकल परेरा यांना गुजरात पोलिसांनी अहमदाबाद येथे बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज चालविण्याच्या गुन्ह्यात डिसेंबर २०२१ मध्ये अटक केली होती,याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यानंतर या दोन्ही संचालकांनी राजीनामा दिला होता.

अशा संबंधित गुन्हेगारांच्या कंपनीकडे पिंपरी चिंचवडचे केबल इंटरनेट कनेक्शनचे काम देण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आणि देशविघातक ठरू शकतो,अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.शहराची इंटरनेटसारखी महत्वाची व अत्यंत संवेदनशील सेवा एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीच्या हातात पडल्यास त्याचा दुरुपयोग होऊ शकतो, असे ते म्हणाले.

Ajit Gavhane
Laxman Jagtap Allegation : पिंपरी पालिका प्रशासनाला आमदार जगतापांनी धरले धारेवर : थेट भ्रष्टाचाराचे आरोप!

सदर टोळी VOIP (व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल कॉल्स) हे GSM (मोबाइल कम्युनिकेशनसाठी ग्लोबल सिस्टम) कॉल्समध्ये रूपांतरित करतात. अशा प्रकारे VOIP चे GSM कॉल्समध्ये रुपांतरित करून खंडणीची मागणी बिनदिक्कत होऊ शकते. तसेच डाटा चोरून त्याचा माध्यमातून एखाद्याची मोठी आर्थिक फसवणुकही होऊ शकते. कदाचित त्यातून मोठमोठ्या वित्त संस्थांनाही धोका संभवतो. शहरातील नागरिकांच्या वैयक्तिक जीवनातसुध्दा ढवळाढवळ करुन एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. सगळ्यात महत्वाचे म्हणते देश विघातक कार्य देखील यातून घडू शकते,असेही गव्हाणे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com