Laxman Jagtap Allegation : पिंपरी पालिका प्रशासनाला आमदार जगतापांनी धरले धारेवर : थेट भ्रष्टाचाराचे आरोप!

Laxman Jagtap : मशीनची किंमत ३ ते ४ लाख आहे. मात्र, पालिकेने ६ लाख ८० हजार रुपये मोजले.
Laxman Jagtap Allegation
Laxman Jagtap AllegationSarkarnama
Published on
Updated on

Pimpari Chinchwad Corporation : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत आता आरोप होत आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांनीच पालिकेवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. १५१ कोटी रुपयांच्या जॅकवेल बांधणीच्या निविदेमध्ये २० ते २५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप आमदार लक्ष्मण जगताप यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. यानंतर त्यांनी पिंपरी पालिकेच्याच दीड कोटी रुपयांच्या हाय सक्शन मशिन खरेदी घोटाळा, आता उघडकीस आणला आहे. यासाठी त्यांनी हा प्रश्न थेट विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता.

जवळजवळ दुप्पट किमतीने या मशिन पालिकेने खरेदी केल्या होत्या. त्यामुळे जनतेच्या कररुपातील पाऊण कोटी रुपये नाहक खर्ची पडले होते. यामुळे जगताप यांनी याबाबत तारांकिंत प्रश्न दिला होता. याच्या उत्तरात महापालिकासह रुग्णांची फसवणूक करणाऱ्या सेवर्ड सिस्टीम INC बोरिवली, मुंबई या हाय सक्शन मशिन पुरवठा ठेकेदाराचा आदेश रद्द करण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Laxman Jagtap Allegation
Buldana जिल्ह्यात सरपंचांनी घेतलेल्या सोयीच्या भूमिका, सर्वसामान्यांचा विकास करणार का?

तसेच या ठेकेदाराने भरलेली अनामत रक्कमही जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. संबंधित ठेकेदाराने निविदेतील अटी व शर्तीमध्ये नमूद टेक्निकल स्पेशिफिकेशननुसार हाय व्हॅक्युम सक्शन मशीनचा पुरवठा केले नसल्याचे, मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे.सरकारच्या जीईएम पोर्टलवर या मशीनची किंमत ३ ते ४ लाखांच्या घरात आहे. मात्र, पिंपरी पालिकेने त्यासाठी ६ लाख ८० हजार रुपये मोजले. या किमतीत अशा या वीस मशिन खरेदी करण्यात आल्या होत्या.तसेच त्या निविदेतील अटी व शर्तीनुसार नसल्याचे आढळले होते.

Laxman Jagtap Allegation
Sushant Singh Rajput case : राहुल शेवाळेंचा लोकसभेत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप : 'AU' नावाने रियाला 44 कॉल!

या मशीन खरेदीची निविदाच एक प्रकारचा गडबड घोटाळा होता. त्याच्या प्रक्रियेमध्ये निश्चित केलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून संबंधित अधिकाऱ्यांनी या पुरवठादार ठेकेदाराला पात्र केले होते.निविदेत मशिनमध्ये कोणत्या टेक्निकल स्पेशिफिकेशन असाव्यात हे नमूद आहे. त्यानुसार मशीन देणे आवश्यक होते. प्रत्यक्षात दिलेल्या मशीन निविदेतील टेक्निकल स्पेशिफिकेशनच्या नसल्याचे आमदार जगताप यांनी पालिका आय़ुक्त तथा प्रशासकांच्या निदर्शनास आणले होते.

धक्कादायक बाब म्हणजे वैद्यकीय विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनीही निविदेत नमूद टेक्निकल स्पेशिफिकेशन नसलेल्या मशीन पुरवठादार ठेकेदाराकडून वायसीएम रुग्णालयात दाखल करून घेतल्या होत्या. त्यावरून या प्रकरणात अधिकारीही सामील असल्याचे स्पष्ट होते,असे आ.जगताप म्हणाले. दरम्यान,या कारवाईविरोधात ठेकेदाराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com