Amit Shah and Raj Thackeray : राज ठाकरेंची दिल्लीत अमित शाहांसोबत बैठक?; 'मनसे'चा महायुतीत प्रवेश होण्याची चिन्हं!

Raj Thackeray Delhi Tour : राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार मनसेचा भाजपसमोर लोकसभेसाठी दोन जागांचा प्रस्ताव आहे.
MNS
MNSSarkarnama
Published on
Updated on

गणेश कोरे -

MNS And BJP News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत पोहाेचले आहेत. चार दिवसांत त्यांची ही दुसरी दिल्ली वारी आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात राज ठाकरे महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याला आणखी एक कारण म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा दिल्लीतच आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे आणि गृहमंत्री अमित शाह यांची रात्री भेट होणार आहे.

राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार मनसेने भाजपसमोर लोकसभेसाठी दोन जागांचा प्रस्ताव दिला आहे, तर त्यापैकी दक्षिण मुंबईची जागा मनसेला मिळू शकते आणि मनसेच्या अन्य एका उमेदवाराची वर्णी राज्यसभेवर लावली जाऊ शकते. मात्र, याबाबत आणखी चित्र स्पष्ट होणे बाकी आहे.

पुण्यात मनसेने (MNS) भाजप रसद द्यायची, त्या बदल्यात भाजप मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना दक्षिण मुंबईत रसद देऊन मनसेचा पहिला खासदार लोकसभेत पाठविणार असल्याचे खात्रिशीर वृत्त आहे.

भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव भाजपच्या राज्य आणि केंद्रीय नेतृत्वाच्या जिव्हारी लागला. यानंतर खासदार गिरीश बापट याचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने भाजपच्या दबावाखाली पोटनिवडणूक घेणे टाळल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात होती. याबाबत उच्च न्यायालयानेदेखील पोटनिवडणूक न झाल्याबाबत ताशेरे ओढले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MNS
Raj Thackeray News : राज ठाकरे महायुतीत सामील होणार?, चार दिवसांत दुसऱ्यांदा दिल्ली गाठली!

कसब्याच्या पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या कुटुंबीयांना टाळून हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिल्याचा फटका भाजपला बसल्याची चर्चा पुण्यातील राजकीय क्षेत्रात होती. रासने यांच्या उमेदवारीमुळे भाजपचा (BJP) हक्काचा ब्राह्मण समाजाचा मतदार भाजपपासून दुरावल्याचीदेखील चर्चा आहे.

यामुळे ब्राह्मण समाजाची नाराजी दूर करण्यासाठी राज्यसभेवर कोथरूडच्या नाराज माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर संधी देऊन, ब्राह्मण समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. मात्र, तरीसुद्धा स्थानिक भाजप आणि मेधा कुलकर्णी यांच्यातील एकोपा अद्याप दिसून येत नसल्याचे चित्र आहे.

अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत धोका नको म्हणून भाजपने मनसेला साद घातली आहे. पुणे शहरात मनसेच्या मतदारांची संख्या एक लाखाच्यावर आहे. हे एकगठ्ठा मतदान भाजपला मिळाले तर सहज विजयी होऊ असे समीकरण भाजपचे आहे, तर पुण्याच्या बदल्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे निकटवर्तीय बाळा नांदगावकर यांना दक्षिण मुंबईतून भाजप रसद देऊन, लोकसभेत पाठविणार असल्याचे नियोजन सुरू असल्याचे खात्रिलायक माहिती आहे.

MNS
Sanjay Shirsat News : ना भूकंप, ना उमेदवारांची यादी, शिवसेनेच्या शिरसाटांचे हवेतच बाण!

...तर श्रीकांत शिंदे यांना मनसेच्या राजू पाटलांची रसद -

कल्याण मतदारसंघदेखील या वेळी लक्षवेधी ठरणार आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरे गटाने कल्याण विधानसभा आणि लोकसभेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील लढतदेखील लक्षवेधी ठरणार आहे.

यासाठी शिंदे गटदेखील श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यासाठी कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही. कल्याणची लढत श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सोपी होण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांची ताकद श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी उभी करणार असल्याचे समजते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com