Sanjay Shirsat News : ना भूकंप, ना उमेदवारांची यादी, शिवसेनेच्या शिरसाटांचे हवेतच बाण!

Shivsena News : ...त्यामुळे शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी आणखी रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
MLA Sanjay Shirsat
MLA Sanjay Shirsat Sarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट हे सध्या कायम चर्चेत असलेले नेते. ठाकरे गटाकडून संजय राऊत यांच्यासह प्रत्येक विरोधी पक्षाच्या टीकेला, जशास तसे उत्तर देण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांचे संजय शिरसाट गेल्या दीड वर्षांपासून नेटाने पार पाडत आहेत. मुंबईत असो की छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांचा दरबार कायम भरलेला असतो. त्यामुळे अगदी गल्ली ते दिल्ली अशा सगळ्याच विषयांवर शिरसाट जोरकसपणे भूमिका मांडतात.

दोन दिवसांपुर्वी त्यांनी शहरात प्रसार माध्यमाशी बोलतांना राज्यात मोठा भूंकप होणार असल्याची भविष्यवाणी केली होती. त्यासाठी सोमवार म्हणजेच आजचा मुहूर्त दिला होता. याशिवाय शिवसेनेच्या दहा लोकसभा उमेदवारांची यादीही आज जाहीर होणार असल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. पण राज्यात भूंकप होणार ही संजय शिरसाट(Sanjay Shirsat) यांची भविष्यवाणी आणि उमेदवारांची यादी जाहीर होणार ही चर्चा म्हणजे शिवसेनेचे हवेतील `बाण`च ठरले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Sanjay Shirsat
Imtiyaz Jaleel News : महायुती, महाविकास आघाडीचं ठरेना; 'एमआयएम'ने मारली बाजी

राज्य पातळीवर भाजप(BJP) महायुतीच्या गाडीला मनसेचे इंजिन लावण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी आणखी रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजय शिरसाट यांनी सोमवारी भूंकप होणार, असा दावा केला होता. त्यामुळे आज दिवसभर या भूंकपाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते, पण तो काही झालाच नाही. शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी भूंकपाचा इशारा दिल्यामुळे तो होणारच, या आशेवर बसलेल्या अनेकांचा यामुळे भ्रमनिरास झाला.

बरं शिरसाट यांनी केलेले दावे फोल ठरण्याची ही काही पहिली वेळ नाही. राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, पहिल्या मंत्रिमंडळात अपेक्षा असतांना शिरसाट यांना संधी मिळाली नाही. तेव्हापासून लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला संधी मिळेल, असं शिरसाट सांगायचे. मंत्रिमंडळ विस्तारांचे असे अनेक मुहूर्त हुकले, पण शिरसाट काही थांबले नाहीत.

MLA Sanjay Shirsat
Omraje Nimbalkar : लोकांचे फोन उचलण्याशिवाय ओमराजेंनी काय काम केलं? अजित पवार गटाचे कळीच्या मुद्द्यावर बोट

2024ची लोकसभा निवडणूक जाहीर झाली, सगळे पक्ष तयारीला लागले. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची(Shivsena) यादी रखडली, सोबत असलेल्या 13 खासदारांना उमेदवारी देतांना मुख्यमंत्र्यांच्या नाकीनऊ येत आहेत. विद्यमान खासदार असलेल्या काही जागांवर भाजपने दावा केला आहे, ते निस्तारण्यातच मुख्यमंत्र्यांची शक्ती आणि वेळ खर्ची पडत आहे.

लोकसभेनंतर सहा महिन्यानी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे संजय शिरसाट यांनी वर्षभरापासून सांगितलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार काही होण्याची सुतराम शक्यता नाही. आता सोमवारी होणाऱ्या भूकंपाचा शिरसाटांनी सांगितलेला मुहूर्त हुकला, तेव्हा यावर आता ते नवा मुहूर्त सांगतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com