Pune Crime : लाखोंचे कर्ज फेडण्यासाठी त्याने रचला खंडणीचा डाव अन् वापरले मोहोळांचे नाव

Muralidhar Mohol : या प्रकारामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

Muralidhar Mohol
Muralidhar MoholSarkarnama
Published on
Updated on

Pune News : भाजपचे नेते आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरून दोन जणांनी एका व्यावसायिकाला तब्बल तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे.

भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी तीन कोटी रुपये द्या, अशी मागणी दोन जणांनी एका व्यावसायिकाकडे केली. या प्रकरणी संदीप पाटील आणि शेखर ताकवणे या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांपैकी एक संशयित कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमा भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्याकडून अनेक साहित्य जप्त केल्याची माहिती स्वतः मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुण्यातील नामांकित व्यावसायिकाने या संदर्भात पोलिसात तक्रार दिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. यातील संदीप पाटील नामक व्यक्तीच्या डोक्यावरील लाखोंचे कर्ज फेडण्यासाठी त्याने हा डाव आखल्याचं समोर आलं आहे.


Muralidhar Mohol
Shinde-Fadnavis Press Conference : बोलण्याच्या भरात मुख्यमंत्री शिंदे महत्वाचे मुद्देच विसरले; अन् मग फडणवीसांनी केलं 'प्रॉम्पटिंग'

पाटील याने शेखरच्या मदतीने त्याच्या मोबाईलवर एक ॲप डाऊनलोड करून त्यात मुरलीधर मोहोळ यांचा मोबाईल क्रमांक सेव्ह केला. या ॲपद्वारे त्यांनी व्यावसायिकाला मोहोळ बोलतोय, असं भासवलं. त्यांना भाजप युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी हे पैसे लागणार आहेत, असं सांगितलं.

आरोपींनी गुगलवरुन या व्यावसायिकाचा नंबर शोधला. त्यानंतर एका ॲपचा वापर करत त्या माध्यमातून मुरलीधर मोहोळ बोलतोय असं भासवत तीन कोटी द्या, अन्यथा तुमच्या नावाची बदनामी करू अशी धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले.


Muralidhar Mohol
Satara : टोलनाके चालवणाऱ्या खासदारांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये...शिवेंद्रराजे

दरम्यान, या सगळ्या प्रकाराबाबत मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः खुलासा केला असून यातील कुठल्याच व्यक्तीला आपण ओळखत नसून झालेला प्रकार धक्कादायक असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com