धक्कादायक; मदत करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला पावणेसहा लाखाला गंडा

Pune Crime News : ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक
Pune Crime News
Pune Crime Newssarkarnama
Published on
Updated on

Pune Crime News : ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याच्या बहाण्याने एकाने तब्बल पावणे सहा लाखांचा गंडा घातला आहे. एटीएममधून रोकड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याचा बहाणा या चोरट्याने केला. ज्येष्ठाचे डेबीट कार्ड आणि पीन कोड चोरुन त्याआधारे वेळोवेळी पैसे काढून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Pune Crime News
Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘गुजरात बढाओ, देश डुबाओ’ या धोरणावर काम कर आहेत !

याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारदार ज्येष्ठ नागरिकर हे शनिवार पेठेतील रहिवाशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑक्टोबर रोजी फिर्यादी बाजीराव रस्त्यावरील एका बँकेच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी चोरटा एटीएम केंद्राच्या परिसरात थांबला होता. फिर्यादी एटीएममधून पैसे काढत असता चोरटा एटीएम केंद्रात आला आणि त्याने मदत करण्याचा बहाणा केला.

Pune Crime News
Chhagan Bhujbal : सुरक्षा काढणे योग्य नाही, सरकारने पुनर्विचार करावा : भुजबळांची मागणी!

चोरट्याने हातचलाखीने फिर्यादींचे डेबिट कार्ड चोरले. त्याऐवजी त्यांना दुसरे डेबिट कार्ड दिले. तसेच फिर्यादी यांच्याकडून कार्डचा पीन नंबर घेतला. ज्येष्ठ नागरिकाचे चोरलेले डेबिट कार्ड आणि पीन नंबरचा गैरवापर करून चोरट्याने गेल्या बारा दिवसात वेळोवेळी बँक खात्यातून पाच लाख ७९ हजार रुपये लांबविले. बँक खात्यातून पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक वर्षाराणी सुतार या करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com