AAP Akrosh March : तलाठी भरती घोटाळ्याविरोधात 'आप'ने पुण्यात काढला 'आक्रोश' मोर्चा!

Talathi Recruitment Scam : तलाठी तसेच सर्व परीक्षा 'महाराष्ट्र लोकसेवा आयोग'च्या माध्यमातुन घेतल्या जाव्यात,अशी मागणी केली.
AAP
AAPSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यात सर्वच क्षेत्रात खासगीकरणाच्या दिशेने राज्यकर्त्यांची वाटचाल सुरू आहे. गेले अनेक वर्षात सरकारी भरती झालेली नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग बेरोजगार झालेला आहे. त्यातच राज्य सरकारच्यावतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

या विरोधात आवाज उठवून देखील याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले आहे, असा आरोप करून याचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये कोणतीही पारदर्शकता राहिलेली नाही. दिवसरात्र अभ्यास करून स्पर्धा परीक्षांना तोंड देणाऱ्या अनेक तरुण मुलांचे या पेपर फुटीमुळे मोठे नुकसान होत आहे. पेपर फुटीच्या प्रकरणात आम आदमी पार्टीने आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांनी आंदोलन केल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कुठलेही ठोस आश्वासन आंदोलन करणाऱ्यांना दिले नाही, असा आरोप आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

AAP
ACB action in Pune : दहा हजारांची लाच घेणाऱ्या वजनमापे निरीक्षकाच्या घरात सापडलं घबाड!

झोपेचे सोंग घेतलेल्या राज्य सरकारचे डोळे उघडण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने पुण्यात टिळक चौक (अलका टॉकीज) ते गुडलक चौक असा 'आक्रोश मोर्चा' काढून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी आपचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सदोष 'तलाठी भरतीची परीक्षा रद्द करून, तलाठी तसेच सर्व परीक्षा 'महाराष्ट्र लोकसेवा आयोग'च्या माध्यमातुन घेतल्या जाव्यात,अशी मागणी केली.

याचबरोबर नोकभरतीच्या परीक्षेत झालेल्या पेपरफुटीची चौकशी करण्यासाठी कोर्टाच्या अध्यक्षतेखाली 'विशेष चौकशी समिती'ची स्थापना करून पुढील 45 दिवसांमध्ये समितीला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. यापुढील काळात पेपरफुटी सारखे प्रकार घडू नयेत, यासाठी कठोर कायदे तयार करावेत, अशा मागण्या करण्यात आल्या.

सरकारी नोकरी मिळत असल्याने आज अनेक तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षांकडे आकर्षित झाले आहेत. त्यामध्ये पेपर फुटीसारखे प्रकार घडत असतील तर या तरुणांनी कोणाकडून न्यायाची अपेक्षा करायची? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. हे पेपर फुटीचे प्रकरण यापुढेही चालू राहिले तर आम आदमी पार्टी तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

AAP
PM Modi Pune Tour : ...यासाठी पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर येणार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे गृहमंत्री असताना देखील अशा पेपर फुटी प्रकरणावर कुठल्याही प्रकाराची कठोर कारवाई होत नसल्याने फडणवीस यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होतो, असा आरोप देखील यावेळी करण्यात आला. या आक्रोश आंदोलनात मोठ्या संख्येने युवक वर्ग सहभागी झाला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com