PM Modi Pune Tour : ...यासाठी पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर येणार?

Narendra Modi News : 'ही' तारीखही निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 19 फेब्रुवारीस मोदी येणार असून, पुण्याच्या नवीन विमानतळाच्या इमारतीचं आणि महात्मा फुले स्मारकाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार असल्याची चर्चा आहे.

याचबरोबर 19 फेब्रुवारीस शिवजंयती असल्याने यानिमित्त मोदी (Narendra Modi) पुणे जिल्ह्यातीलच शिवनेरीगडावरील सोहळ्यासही उपस्थित राहू शकतात, अशीही माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप अधिकृतपणे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबत जाहीर करण्यात आलेलं नाही. कोणत्याही भाजपच्या प्रवक्त्याकडून याबाबत भाष्य करण्यात आलेलं नाही. (PM Modi Pune Tour)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

PM Narendra Modi
Sunil Deodhar : ''...तर पुणे लोकसभा लढवायला मी तयार'' ; सुनील देवधरांचं सूचक विधान!

मागील काही दिवसांत मोदींचे महाराष्ट्र दौरे वाढल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील अटल सेतूचं उद्घाटनही मोदींच्या हस्ते झालं होतं. आता जर मोदी पुण्यात आले तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

दरम्यान, लोकसभेची निवडणूक जवळ आल्याने पुणे लोकसभा मतदारसंघात अनेक उमेदवार इच्छुक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांचेही नाव आघाडीवर आहे. सुनील देवधर हे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे निकवर्तीय समजले जातात. त्रिपुरामध्ये २५ वर्षांपासूनच्या डाव्यांच्या प्रभावाला खिंडार पाडून तेथे भाजपला यश मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

PM Narendra Modi
Ravindra Dhangekar : आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा; अधिकाऱ्याला शिवीगाळ करणे भोवले

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी सुनील देवधर (Sunil Deodhar) यांच्याशिवाय भाजपकडून माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार संजय काकडे यांचीही नावे चर्चेत आहेत. एवढेच नाही तर मध्यंतरी दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही नावाच्या चर्चांनी समाजमाध्यमांवर जोर धरला होता.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com