‘अब्दुल सत्तार जिथे जातात तिथे गमती करतात; ते कृषीमंत्री नसून स्वखुशीमंत्री’

सत्ताधाऱ्यांनी जरूर या भागात यावे. आता आम्ही येऊन गेल्याचे कळल्यावर ते येतीलच. पण, येत असतानाच त्यांनी शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश घेऊन यावेत. बांधावर मोकळे जाऊन उपयोग नाही.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

शिरूर (जि. पुणे) : पन्नास खोक्यांतून आमदारांचा दुष्काळ हटला असेल. पण, सामान्यांचे, शेतकऱ्यांचे काय? आम्ही पोटतिडकीने हेच सरकारला विचारतोय; पण दखल घेतली जात नाही. मजामस्ती, राजकारण बाजूला ठेवून आता कृषिमंत्र्यांनी गंभीर व्हावे. ते जिथे जातील, तिथे गमती करतात. जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीविषयी, शेतकरी मदतीविषयी विचारण्याऐवजी भलतेच विचारतात. ते कृषिमंत्री नसून स्वखुशीमंत्री झालेले दिसतात, अशी टीका युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर केली. (Abdul Sattar is not Agriculture Minister but Minister of Self-Happiness : Aditya Thackeray)

शिरूर तालुक्यातील वाघाळे येथील शेतकऱ्यांशी बैठकीच्या निमित्ताने त्यांनी थेट रस्त्यावरच बसकण मारली. या परिसरातील दोनशे ते तीनशे हेक्टर शेतशिवारात अद्याप पाणी आहे. या चिखलात सत्ताधाऱ्यांना घेऊन जायला हवे, असे सांगताना त्यांनी सत्ताधाऱ्यांनी जरूर या भागात यावे. आता आम्ही येऊन गेल्याचे कळल्यावर ते येतीलच. पण, येत असतानाच त्यांनी शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश घेऊन यावेत. बांधावर मोकळे जाऊन उपयोग नाही. सत्ताधारी आले की, शेतकरी विचारतीलच द्यायला काय आणले आहे ते. म्हणून त्यांनी नुसते बघायला येऊन नये. हे काही पर्यटन नाही, हे देखील ध्यानात घ्यावे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray
इंदापुरातून विजयाचा ढोल कोणाचा वाजणार...हर्षवर्धन पाटील, दत्तात्रेय भरणे की प्रवीण माने?

अवकाळी पावसाने बळीराजाची दाणादाण उडवल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मी फिरत असताना आता सत्ताधारीही बांधावर येतील. पण, ते नुसते मोकळ्या हाताने पाहणी करायला आले, तर त्यांना बांधावर फिरू देऊ नका. मदतीबाबत जाब विचारा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

Aditya Thackeray
Kailas Patil Hunger Strike : संतप्त शिवसैनिकांनी कलेक्टर ऑफीस गेटला लावले कुलूप; कलेक्टरांनाही दोन तास नो एन्ट्री!

राज्यात नवीन सरकार आल्यानंतर गेल्या तीन महिन्यांत नऊशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता आणखी वाट पाहणार आहात का?, प्रत्येकवेळी विरोधी पक्षाने आंदोलन करणे, सरकारला धारेवर धरणे गरजेचे आहे का?, सभा घेऊनच या गोष्टी सांगितल्या पाहिजे का?, प्रशासन, शासन म्हणून संवेदनशील होऊन या मुलभूत मागण्यांबाबत तातडीने मदत पोचेल, हे का बघत नाही?, असे सवाल ठाकरे यांनी राज्य सरकारला केले. निवडणूका असल्या की सर्वजण बांधावर येतात. आज मदतीची गरज आहे, तेव्हाही आले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com