Baramati Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे राज्यभरात विविध राजकीय घडामोडी बघायला मिळाल्या. राज्यभरात असे काही मतदारसंघ आहेत, ज्या ठिकाणच्या लढतींकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे.
असाच बारामती विधानसभा मतदारसंघ देखील आहे. ज्यामध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडणूक लढणार आहेत, तर त्यांच्या विरोधात त्यांच्या कुटुंबातीलच सदस्य आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढणवार आहेत.
तर याच मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात आता कायम चर्चेत असलेलं व्यक्तिमत्व बिग बॉस फेम अभिजीत बिचुकल (Abhijeet Bichukale) यांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे बारामती मतदासंघातली लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे दिसत आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बिचुकले यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ते येथून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
याआधी अभिजीत बिचुकले यांनी मुंबईमधील वरळी, पुण्यातील कसबा(पोटनिवडणूक) या मतदारसंघांमधूनही निवडणूक लढवलेली आहे. याशिवाय पंढरपूर-मंगळवेढा येथूनही निवडणुकीत नशीब आजमावले असून, 2024ची लोकसभा निवडणूकही त्यांनी कल्याण येथून श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात लढवलेली आहे.
आतापर्यंत अभिजीत बिचुकले यांनी अनेक निवडणुका लढवल्या आहेत, मात्र त्यांना एकाही निवडणुकीत यश आलेलं नाही. परंतु तरीही ते निवडणूक लढवताना दिसतात आणि नेहमीच चर्चेतही राहतात.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.