Pune News, 29 Oct : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांतील भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक केंद्रावर दाखल झाले होते. मात्र, त्यांना वरिष्ठांचा एक फोन आला आणि जगदीश मुळीक यांनी अर्ज दाखल न करताच माघारी फिरणं पसंत केलं आहे.
महायुतीमध्ये (Mahayuti) वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. या ठिकाणी विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हा मतदारसंघ आपल्याकडे राहावा यासाठी भारतीय जनता पक्षदेखील आग्रही होता.
या मतदारसंघात भाजपचे (BJP) माजी आमदार जगदीश मुळीक निवडणूक लढण्यावर ठाम होते. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र या सर्व नाट्यावर अखेर पडला पडला आहे. मुळीक यांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोन आला आणि ते अर्ज दाखल न करतात माघारी फिरल्याचं समोर आलं आहे.
माध्यमांशी बोलताना जगदीश मुळीक (Jagdish Mulik) म्हणाले, "सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि मतदारांची इच्छा होती की, या मतदारसंघात भाजपचा उमेदवार असावा. हा मतदारसंघ महायुतीमध्ये आपल्याकडे राहावा यासाठी आम्ही वरिष्ठांना मागणी देखील केली होती.
आम्ही घेतलेल्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी वडगाव शेरीतून मला अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म दिला होता. अर्ज भरण्याच्या आदेशही दिले होते. मात्र फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात काही बिघाडी होऊ शकते या दृष्टीकोनातून अर्ज भरणे थांबवण्यास सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतर लगेच आम्ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया थांबवली."
दरम्यान, वरिष्ठांकडून कोणतही आश्वासन सध्या मिळालं नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. शिवाय पक्षासाठी काम करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, भारतीय जनता पार्टी छोट्या-मोठ्या सर्वच कार्यकर्त्यांचा विचार करते. त्यामुळे मी कोणतंही आश्वासन न घेता फक्त वरिष्ठांचं ऐकून फॉर्म भरणे थांबवले आहे. भविष्यात वरिष्ठ जे आदेश देतील त्याचं आम्ही पालन करणार आहोत. पक्ष जिथे आदेश येईल तिथे आम्ही महायुतीचा प्रचार करणार आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.