Abhijit Bichukale: ''...म्हणून २०२४ ला महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या!''; अभिजित बिचुकले असं का म्हणाले?

Maharashtra Politics: मला अद्याप लोकांनी निवडून दिलं नाही....
Abhijit Bichukale
Abhijit Bichukale Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपसह महाविकास आघाडीनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी आरोप प्रत्यारोपांनी दिवसेंदिवस निवडणुकीचा ज्वर वाढतच चालला आहे. याचवेळी अभिजित बिचुकले यांनीही २०२४ मध्ये महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या असं आवाहन केलं आहे.

'बिगबॉस' फेम अभिजित बिचुकले हे त्यांची बिनधास्त मतं व हटके स्टाईलमुळे कायमच चर्चेत असतात. यावेळी बिचुकले हे कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवत आहेत. यावेळी त्यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी पोटनिवडणुकीतील प्रचारासाठी पुण्यात तळ ठोकला आहे. तसेच मतदारसंघात भेटीगाठींनी वेग घेतला आहे.

Abhijit Bichukale
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादीलाही फडणवीसांचे टोले; म्हणाले...

अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. बिचुकले म्हणाले, मी लोकशाही मानणारा नागरिक आहे. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी तिथे जातात. मला अद्याप लोकांनी निवडून दिलं नाही. त्यामुळे येत्या काळासाठी मी एवढंच सांगेन की, जे झालं ते पुरेसं झालं असं म्हणाले.

Abhijit Bichukale
Supreme Court Hearing: सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी संपली; सिब्बलांचा जोरदार युक्तीवाद : न्यायधीशांची महत्त्वाची टिप्पणी

शिवाय शिवसेना उद्धव ठाकरे गट असो वा एकनाथ शिंदे गट असो, जे कुणी असेल त्या सगळ्या पक्षांना एकदा घरीच बसवा. अभिजीत बिचुकले तुम्हाला एक चांगला पर्याय म्हणून आला आहे. असलं राजकारण थांबवायचं जनतेच्या हातात आहे. तुम्ही २०२४ मध्ये महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या असं आवाहन बिचुकले यांनी मतदारांना केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com