Pimpri-Chinchwad : पिंपरी पालिकेत लिपिक एसीबीच्या जाळ्यात; भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादी अन् भाजपमध्ये जुंपली

BJP and NCP : भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप
Pimpri Chinchwad News Pcmc
Pimpri Chinchwad News PcmcSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील लिपिक दिलीप भावसिंग आडे (वय ५१) याला एक लाख रुपयांची लाच घेताना आज दुपारी मुख्यालयातच पकडण्यात आले. यातून पालिकेतील आणखी भ्रष्टाचार समोर आल्याने प्रशासनासह पालिकेतील माजी सत्ताधारी भाजपवरही राष्ट्रवादी काँग्रेसने लगेच हल्लाबोल केला.

महापालिकेतील या भ्रष्ट्राचाराला केवळ भाजपची सत्ता आणि त्यांचे नेतृत्त्व जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आजच्या लाचखोरीनंतर केला. भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे आज पकडलेला लिपिक हे एक टोक असून तो करण्यास भाग पाडणारे अधिकारी आणि त्यांना राजकीय पाठबळ देणाऱ्या बड्या माशांना पकडावे, असे आव्हान त्यांनी 'एसीबी'ला (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) दिले आहे.

Pimpri Chinchwad News Pcmc
Congress News : सिद्धरामय्यांच्या मतदारसंघावरून काँग्रेसमध्ये महाभारत : कोलारमधून लढण्याचा निर्णय मागे; समर्थकांचे धरणे

भाजपच्या काळात खंडणीखोरी, लाचखोरी आणि भ्रष्टाचार मुळापर्यंत रुजला. गेल्या पाच वर्षांत ज्या पद्धतीने भ्रष्ट कारभार झाला त्याच पद्धतीने प्रशासकीय राजवटीतही कारभार सुरू आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

राज्यात भाजपची सत्ता असल्याने प्रशासकावर भाजपच्या स्थानिक नेत्यांचा अंकुश आहे. त्यातूनच आपल्याला हवी तशी कामे करून घेण्यासाठी भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे, असा आरोप त्यांनी नाव न घेता भाजपचे स्थानिक वजनदार नेते तथा शहर कारभाऱ्यांवर केला.

Pimpri Chinchwad News Pcmc
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबियांना धमकी; महेश आहेर यांच्यावर मोठी कारवाई

पालिकेची प्रत्येक निविदा ही रिंग करूनच भरली जाते. शेकडो कोटींच्या निविदा फुगविण्यात येत असून निश्चित दरापेक्षा अधिक रक्कमेने त्या दिल्या जात आहेत. जे ठेकेदार प्रामाणिकपणे काम करू पाहतात, त्यांना दमबाजी करून बाजूला केले जाते. त्यासाठी पालिकेचे अधिकाऱ्यांकडून निविदा आपल्या हस्तकांना देण्याचा प्रकार भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून सुरू आहे, असा आऱोप गव्हाणेंनी केला.

लिपीकाची कसून चौकशी केल्यास मोठे मासे गळाला लागतील. त्यामुळे एसीबीने केवळ कारवाईचा फार्स न करता दोषी वरिष्ठ अधिकारी आणि त्यांना राजकीय पाठबळ देणाऱ्या लोकांपर्यंतचे धागेदोरे शोधल्यास सत्य बाहेर येईल, असे ते म्हणाले. पाणीपुरवठा विभागाच्या ‘जॅकवेल’च्या बांधणी निविदेतही झालेल्या करोडोंच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Pimpri Chinchwad News Pcmc
Maharashtra Budget Session : पाणी कोटा द्या, अन्यथा बांधकामांच्या परवानगी थांबवा; राजू पाटील कडाडले

''वारंवार होणाऱ्या एसीबीच्या कारवाईमुळे शहराची बदनामी होतेय''

पिंपरी पालिकेच्या कारभारावर कोणाचेही नियंत्रण राहिलेलं नाही, असे आजच्या एसीबीच्या कारवाईतून स्पष्ट झाले असून वारंवार प़डणाऱ्या त्यांच्या धाडीमुळे शहराची बदनामी होत आहे, असे पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे म्हणाले.

पालिका भ्रष्टाचाराचे कुराण झाली असून प्रशासकीय राजवटीतही मनमानी कारभार सुरु आहे. त्यातून जनतेच्या पैशाची लूट होत आहे. चुकीच्या नेतृत्वाकडे शहराची सूत्र गेल्यानंतर काय होते, याची प्रचिती पिंपरी चिंचवडकरांना आजच्या घटनेसारखी वारंवार येत आहे, असे नाव न घेत त्यांनी भाजप व त्यांच्या कारभाऱ्यांनाच लक्ष्य केलं.

Pimpri Chinchwad News Pcmc
Pimpri-Chinchwad : नऊवारी नेसून दुचाकीवर जगभ्रमंती; चिंचवडच्या रमिलाला मोदींनी दिला आशिर्वाद

प्रशासन व नेते मस्त! पिंपरी चिंचवडकर जनता त्रस्त!

दरम्यान, पाणीपुरवठाच नाही, तर बांधकाम परवाना, नगररचना, स्थापत्य, आरोग्य व वैद्यकीय, ड्रेनेज, भांडार, आदी सर्वच पालिकेच्या विभागात प्रचंड भ्रष्टाचार बळावला आहे, असा दावा माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी केला.

अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नत्या यामध्ये राजकीय नेते आपले हात धुवून घेत आहेत. त्यातून करदात्या पिंपरी चिंचवडकरांच्या तिजोरीवर दरोडा पडत आहे. दुसरीकडे तो रोखण्याची जबाबदारी असणारे प्रशासक तथा पालिका आयुक्त शेखर सिंह हे, मात्र ठेकेदार, बांधकाम व्यवसायिक, अधिकाऱ्यांच्या बैठकांत मश्गूल आहेत, अशी टीका त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com