Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबियांना धमकी; महेश आहेर यांच्यावर मोठी कारवाई

Thane News : काही दिवसांपूर्वी आव्हाडांच्या मुलीला व जावयाला मारण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.
Jitendra Awhad
Jitendra Awhad Sarkarnama

NCP News : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना काही दिवसांपूर्वी धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी राज्य सरकारने ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी महेश आहेर यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.

या धमकीप्रकरणी अधिकारी महेश आहेर यांच्यावरील आरोपांची चौकशी होईपर्यंत त्यांचा कार्यभार काढून घेतला जाईल, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी विधिमंडळात केली.

आव्हाडांच्या कुटुंबियांना धमकी देण्याची महेश आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर आव्हाडांनी महेश आहेर यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

Jitendra Awhad
Girish Mahajan : गिरीष महाजन गोल गोल काय दळण दळतात, कळतच नाही !

या प्रकरणी आज विधिमंडळात विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच इतके वर्ष महेश आहेर यांची ठाण्यात एकाच जागी नियुक्ती कशी? त्यांचे तात्काळ निलंबन करणार का? त्यांच्यावरील गुन्हे सिद्ध झाल्यास काय कारवाई करणार? असे अनेक प्रश्न अनिल परबांनी सभागृहात उपस्थित केले.

Jitendra Awhad
Karad : रेल्वेमंत्री प्रभूंच्या हस्ते भूमिपूजन; तरीही कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्ग बारगळला कसा...

त्यानंतर अधिकारी महेश आहिर यांची चौकशी सुरू असे पर्यंत कार्यभार काढून घेतला जाईल, अशी घोषणा उदय सामंतांनी केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आव्हाडांच्या मुलीला व जावयाला मारण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आहेर यांना मारहाण केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com