कृष्ण प्रकाश यांच्या नावे महिला पोलिसाकडे मागितली खंडणी; `गूगल पे` ने सापडला जाळ्यात

PCMC Police : बदलीसाठी सीपींना (Krishna Prakash) पैसे द्यावे लागतील असे सांगून भामट्याने महिला पोलिस हवालदाराची केली फसवणूक
Pimpri-Chinchwad, Commissioner of Police
Pimpri-Chinchwad, Commissioner of Policesarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : दबंग पोलिस आयुक्त म्हणून कृष्णप्रकाश (Krishnaprakash) यांची अल्पावधीतच पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) ओळख झाली आहे. मात्र, त्यांच्या नावे त्यांच्याच पोलिसांकडून (Police) पीआय पाटील असे नाव सांगणाऱ्या भामट्याने खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता.२५) घडला. सीपींना हा प्रकार समजताच त्यांनी तातडीने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आणि आरोपीचा शोध घेण्याचा आदेश दिला आहे.

तथाकथित माथाडी नेते खंडणी उकळत असल्याच्या भोसरी एमआयडीसीतील कारखाने आणि कंपन्यांच्या तक्रारींची दखल न घेतल्याने नुकतीच भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या सिनिअर पीआयची उचलबांगडी कंट्रोलला करण्यात आली आहे. त्यानंतर त्याच पोलिस ठाण्यात खंडणी व फसणुकीचा हा गुन्हा काल दाखल झाला, हा विचित्र योगायोग आहे. या गुन्ह्यात फिर्यादी असलेल्या या पोलिस ठाण्यावतील हवालदार रुपाली रविंद्र सोनवणे (वय ३३) आणि या ठाण्यावरून कंट्रोलला बदली झालेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या समयसुचकेतमुळे हा प्रकार उघडकीस आला.

Pimpri-Chinchwad, Commissioner of Police
वाळूचोरी : दोन ग्रामपंचायत सदस्यांसह माजी नगरसेवकावर गुन्हा; भाजप नेत्याचाही समावेश!

दरम्यान, पोलिस आयुक्तांच्या नावे पोलिसांचीच फसवणूक करणारा हा भामटा कोल्हापूरचा निघाला आहे. मोबाईलवरून त्याचे लोकेशन पोलिसांनी ट्रेस केले असून त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी टीम तिकडे रवाना झाल्याचे तपासाधिकारी पीआय प्रदीप पाटील यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. दुसरा योगायोग म्हणजे या गुन्ह्यातील तोतया पीआय आरोपीने आपले नाव पाटील असे सांगितले आहे. तर, या गुन्ह्याचा तपास पीआय पाटीलच करीत आहेत. पोलिस ठाण्यातील आणखी तीन अंमलदारांकडे या भामट्याने बदलीसाठी पैसे मागितले होते, अशी माहिती त्यांनी दिली. तो पोलिस खात्याची आणि त्यांच्या कार्यपद्धतीची चांगली माहिती असलेला असावा, असे त्याच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून (मोडस ऑपरेन्डी)दिसून येत आहे.

टर्म पूर्ण झालेल्या पोलिस अंमलदारांच्या आता नियमित बदल्या होणार आहेत. ही संधी या तोतया पीआय पाटीलने नेमकी साधली. त्याने काल दुपारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फोन केला. बदलीला कोण कोण कर्मचारी पात्र आहेत, याची यादी पिंपरी-चिंचवड पोलिस नियंत्रण कक्षातून पोलिस निरीक्षक पाटील बोलत असल्याचे सांगणाऱ्या या ठकसेनाने घेतली. नंतर या यादीतील रुपाली सोनवणे यांच्या मोबाईलवर त्याने आपल्या मोबाईलवरून फोन केला. संध्याकाळी बदल्यांचे गॅझेट निघणार असून तुमचीही बदली त्यात आहे, असे त्याने सांगितले.

Pimpri-Chinchwad, Commissioner of Police
सांगवी गॅस स्फोट प्रकरण अजित पवारांच्या दरबारी

तुम्हाला घराजवळ चिखली पोलिस ठाण्यात ती हवी असेल, तर १५ हजार रुपये सीपीसाहेबांना द्यावे लागतील, असे तो म्हणाला. त्यावर प्रसंगावधान दाखवत सोनवणे यांनी कंट्रोलला बदली झालेले आपले साहेब गवारे यांना फोन केला. त्यांनी पाटील नावाचा कोणी अधिकारी तेथे नसल्याचे सांगितले. त्यामुळे हा भामटा असल्याने त्याला ट्रॅक व ट्रॅप करण्यासाठी त्यांनी जाळे टाकले. त्याला पाच हजार रुपये गूगल पे व्दारे देण्यासाठी त्यांनी सोनवणेंना सांगितले. त्यायोगे त्याच्या मोबाईलवरून त्याचा माग काढता येणार होता. म्हणून वरिष्ठांच्या आदेशानुसार मी पाच हजार रुपये या पाटील नाव सांगणाऱ्या भामट्याला दिले, असे सोनवणे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com