सांगवी गॅस स्फोट प्रकरण अजित पवारांच्या दरबारी

सांगवी गावच्या लोकवस्तीमध्ये शनिवार (ता. १९) रोजी गॅस स्फोट झाला होता.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

माळेगाव : होरपळलेल्या एका परप्रांतीय कामगाराच्या वेदना आणि भेदरलेल्या सांगवीकरांच्या भावनांचा विचार करून महसूल विभागासह पोलिसांनी (Police) गॅस स्फोटातील आरोपींना पकडण्यासाठी पुढे यावे, अन्यथा सांगवी गाव बंद ठेवून बारामती (Baramati)-फलटण राज्य मार्गावर रस्ता रोको करावा लागेल, असा इशारा सांगवी (ता. बारामती) ग्रामपंचायत प्रशासनाने आज महसूल आणि पोलिस प्रशासनाला दिला. याशिवाय आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी यासाठी गावकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

सांगवी गावच्या लोकवस्तीमध्ये शनिवार (ता. १९) रोजी गॅस स्फोट झाला होता. विशेषतः भारत गॅस एजन्शीधारकाच्या घरातच घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस बेकायदा व्यवसायिक टाकीत भरताना ही घटना घडली होती. या प्रकरणी महसूल विभागातील पुरवठा शाखेचे संजय शिवाप्पा स्वामी यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये भारत गॅसचे वितरक व निर्मल अरूण एजन्शीचे संचालक सचिन गव्हाणे, नितीन गव्हाणे व गौरी गव्हाणे यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तूचा गैरवापर करणे आदी कलमान्वये कारवाई पोलिसांनी केली होती.

Ajit Pawar
सोमय्या-पोलिसांमध्ये बाचाबाची ; कशेडी घाटात अडविण्याचा प्रयत्न

संशयित आरोपी गुन्हा दाखल होताच फरार झाले आहेत. आठ दिवसांचा कालावधी उलटून गेला असतानाही अद्याप आरोपींना पकडले गेले नसल्याने गावकऱ्यांची प्रचंड संताप व्यक्त केला आहे. तीन वर्षांपुर्वी ग्रामपंचायतीच्या वतीने याच आरोपींविरुद्ध महसूल विभागाकडे तक्रारी केल्याची नोंद आहे. मात्र, त्यावेळीही संबंधितांवर कोणतीच कारवाई झाली नसल्यामुळे त्यांचे मनोबल वाढले. असे असतानाही आताही महसूल व पोलिस प्रशासनाने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्यावितिरिक्त काहीच कारवाई केली नाही. परिणामी त्यांना फरार होण्यास वाव मिळाल्याचे म्हणणे गावकऱ्यांचे आहे.

आरोपींना तातडीने पकडून योग्य ती कारवाई होण्यासाठी आता गावकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. शिवाय गाव बंद ठेवून रस्ता रोखो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती सरपंच चंद्रकांत तावरे यांनी दिली. दुसरीकडे, सांगवी गॅस स्फोटाच्या गंभीर प्रकरणाचा विचार करता भारत गॅस एजन्शीचे सिंलेंडरचे गोडाऊन गावाबाहेर निर्जन ठिकाणी हलवावे, अशी मागणी सांगवी, शिरवली, कांबळेश्वर, शिरष्णेच्या गावकऱ्यांनी केली आहे.

Ajit Pawar
जुन्नरमध्ये बिबट सफारी होणार ; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, शरद सोनवणेंचे उपोषण मागे

आरोपींच्या मागावर पोलिस पथक

सांगवी गॅस स्फोटातील तपासाधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरिक्षक राहूल घुगे म्हणाले, की सांगवी गावातील गॅस स्फोट प्रकरण गंभीर आहे. महसूल विभागाच्या मदतीने आम्ही आरोपींवर कडक कारवाई होण्यासंबंधी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील तांत्रिक तपासही पुर्णत्वाला आला आहे. आता फरार झालेल्या तिनही गुन्हेगारांच्या मागावर पोलिस पथक आहे. लवकरच त्यांच्या मुक्स्या आवळल्या जातील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com