Shirur News : वाबळेवाडी शाळा प्रकरणात झेडपी सीईओ यांना दणका!

Wabalewadi News : आयुष प्रसाद विरोधात मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री ते डीपीटीकडे तक्रारी दाखल झाली होती.
WabaleWadi
WabaleWadiSarkarnama

शिरूर : जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील क व ड संवर्गातील मंजूर पदांच्या सुधारीत आकृतिबंध तयार करण्यासाठीच्या सात सदस्यीय समितीत, पुणे जिल्हा परिषदेत चर्चेतील सीईओ आयुष प्रसाद यांना स्थानच दिलेले नाही. वाबळेवाडी (ता.शिरूर, जि.पुणे) शाळा प्रकरण नीट हाताळले नसल्याच्या कारणाने चर्चेत असताना व त्यांच्या विरोधात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह, शिक्षणमंत्री ते थेट दिल्लीतील डीपीटी (Department of personnel & Training) कडे तक्रारी दाखल झाल्यानेच त्यांना डावलल्याची चर्चा आहे.

WabaleWadi
वाबळेवाडी ग्रामस्थ आक्रमक : सीईओ आयुष प्रसादांवर कारवाई झालीच पाहिजे

राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील क व ड संवर्गातील मंजूर पदांच्या सुधारीत आकृतिबंध तयार करण्याचे काम, शासनपातळीवर हाती घेतले आहे. यासाठी ग्रामविकास विभागाने सात सदस्यीय समिती स्थापन करुन, त्यात सहा जिल्हा परिषदांचे सीईओ आणि एका उपायुक्तांचा समावेश करण्यात आला आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी हे या समितीचे अध्यक्ष असून किरण पाटील (रायगड-CEO), योगेश कुंभोजकर (नागपूर-CEO), वसुमना पंत (वाशिम-CEO), वर्षा ठाकूर-घूगे (नांदेड-CEO), पंकज आशिया (जळगाव-CEO) आदींना या समितीत स्थान दिले गेले आहे. हे सर्व सदस्य सुधारित आकृतीबंध तयार करतील व शासनाला तो सादर झाल्यावरच क व ड संवर्गातील मंजूर पदांच्या भरतीची राज्यातील प्रक्रीया राबवली जाईल.

WabaleWadi
Shikrapur news| वाबळेवाडी शाळेवर सर्व विद्यार्थी-पालकांचा बहिष्कार

पुण्यासारख्या मोठ्या जिल्हा परिषदेचा मोठा अनुभव असलेले आणि पुणे जिल्ह्यातील महसूली विभागातही ब-यापैकी कामकाज राहिलेल्या आयुष प्रसाद यांना या समितीत स्थान दिले जाणार होते. अशी खात्रिलायक माहिती प्रशासकीय वर्तूळात बोलली जात होती. मात्र फडणवीस सरकारपासून ते महाविकास आघाडी सरकारकडून राज्यासाठी आदर्श म्हणविली जाणारी वाबळेवाडी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेचे प्रकरण त्यांनी ज्या पध्दतीने हाताळले, त्यामुळे शाळेतील अनेक विद्यार्थी शाळा सोडून गेले आणि राज्यातील शाळेवर विद्यार्थ्यांनी-पालकांनी बहिष्कार टाकण्याचे अस्त्र उगारले.

ग्रामस्थांनी त्यांची थेट प्रशासकीय अधिकारी नियंत्रण ठेवणा-या डीपीटीकडे तक्रार केली. त्यावरून त्यांना वरील समितीतून डावलल्याचे प्रशासकीय वरिष्ठ वर्गातून बोलले जात आहे. अर्थात याला दुजोरा देताना वाबळेवाडी ग्रामस्थांनीही याच आपल्या भावनांना वाट करुन देत सोशल मिडीयात तसे मेसेजही व्हायरल केल्याचे, आज निष्पन्न झाले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com