Shikrapur news| वाबळेवाडी शाळेवर सर्व विद्यार्थी-पालकांचा बहिष्कार

Shikrapur Wabalewadi School| शाळा बंद करण्याचा डाव दिसत असल्याचा दाट संशय
Shikrapur Wabalewadi School|
Shikrapur Wabalewadi School|

Shikrapur Wabalewadi School| शिक्रापूर : ग्रामस्थ-पालकांकडील लोकवर्गणीने ३४ पटाच्या ५२१ पटापर्यंत पोहचून राज्यातील शाळांसाठी आदर्श ठरलेल्या वाबळेवाडी शाळेतील सर्व विद्यार्थी-पालकांनी या पुढे शाळेतच न जाण्याचा निर्णय नुकताच पालकसभेत घेतला. सव्वा वर्षांपूर्वीपासून अक्षरश: टार्गेट करुन शाळा बंद करण्याचा डाव पुणे जिल्हा परिषदेकडून सुरू असल्याचा जाहीर सभेत सांगत वाबळेवाडीतील सर्वच पालकांनी पुणे जिल्हा परिषद जो पर्यंत आमच्या शाळेवरील हक्क आणि नियंत्रण सोडत नाही तो पर्यंत शाळेत मुले पाठविली जाणार नसून तात्काळ निर्णय न घेतल्यास साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णयही या बैठकीत केला.

केवळ अटलविहारी वाजपेयी नावामुळे पालकांच्या लोकवर्गणीची चौकशी करुन पुणे जिल्हा परिषदेने शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांची चौकशी व निलंबन करुन शाळेचे संपूर्ण कामकाजच विस्कळीत केले. शाळेत सुरू असलेले संगीत, कला, क्रीडा, रोबोटिक्स, प्रोग्रॅम कोडींग, फाउंडेशन, विविध भाषाज्ञान, साहित्य संस्कार हे उपक्रम बंद झाल्याने पहिल्या टप्प्यात सुमारे २०२ विद्यार्थ्यांनी शाळा सोडली.

Shikrapur Wabalewadi School|
Gajya Marane : गुंड गजा मारणेला अटक; पुणे पोलिसांनी वाईजवळ घेतले ताब्यात

याच काळात जिल्हा परिषदेच्या सीईओना जबाबदार धरीत ग्रामस्थांनी सीईओ आयुष प्रसाद यांनी शाळेत यावे असे आवाहन केले. मात्र ते न होता आता अंगणवाडी सेविका, उर्वरित शिक्षक व ग्रामस्थांचीच चौकशी नव्याने सुरू केल्याने आता पालकांचा संयम सुटला असून या पुढे वाबळेवाडी शाळेत विद्यार्थी पाठवायचेच नाही, असा एकमुखी निर्णय शुक्रवारी (ता.१४) रोजी सुमारे तीनशे ते सव्वा तिनशे पालकांच्या उपस्थितीत पालकसभा अध्यक्षा भारती वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. पर्यायाने अंगणवाडी व शाळेतील सध्या शिकत असलेले ४७५ विद्यार्थी यांनी शनिवारपासून (ता.१५) शाळेत जाणे बंद केले आहे.

यापुढील कार्यवाहीचे सर्व अधिकार पालकांनी पालक सभा अध्यक्षा भारती वाबळे, रेष्मा वाबळे, योगिता वाबळे, शैला वाबळे, धनश्री पलांडे, अश्विनी भोसले, सुरेखा दौंडकर, सुमित्रा अरगडे, दिपाली कदम, मोहिनी मांढरे, पुनम विरोळे-पाटील व रुपाली सुर्वे आदी ११ महिलांना देण्याचे ठरले.

Shikrapur Wabalewadi School|
गद्दारांनी बाळासाहेबांच्या फोटोशिवाय लढून दाखवावे!

सव्वा वर्षे हैरान झाल्यानेच मोठा निर्णय...!

ज्यांच्यामुळे शाळेला नावलौकीक मिळाला त्या तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे दोष सव्वा वर्षांनंतरही सिध्द न करणे, शाळेतील उर्वरित शिक्षक व अंगणवाडी सेवीकांसह पालकांचीही चौकशी नव्याने सुरू करणे, शाळेतील ८ चांगले उपक्रम बंद करणे यामुळे हैरान पालकांनी एकत्र येत हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ज्यांनी सीईओ व पालक यांच्या चर्चेची शिष्ठाई केली होती त्या विस्तारअधिकारी वंदना शिंदे यांनी तर शाळेत येणेच बंद केल्याचाही मोठा आक्षेप आहे. विशेष म्हणजे ज्या राजकीय पदाधिका-यांनी जिल्हा परिषदेत शाळेच्या तक्रारी केल्या त्यातील एकही पदाधिकारी पूर्वी कधी आणि आत्ताही वाबळेवाडीत फिरकला नसल्याने पालकांमध्ये तीव्र संताप आहे.

म्हणून विद्यार्थीच शाळेत जावू न देण्याचा निर्णय....!

- अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ८ महत्वाचे उपक्रम बंद

- पूर्णवेळ मुख्याध्यापकच नाही

- दत्तात्रय वारे यांची चौकशी अजुनही अपूर्णच

- सीईओ शिरुर तालुक्यात सारखे येतात पण शाळेत एकदाही फिरकत नाही

- शाळा बंद करण्याचा डाव दिसत असल्याचा दाट संशय

- उर्वरित शिक्षक व ग्रामस्थांनाही चौकशीच्या नोटीसा

- सीईओंच्या प्रतिनीधी वंदना शिंदेही महिनाभरापासून गायब

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com