Vijay Vadettiwar News: 'तो' पुणेकर असो वा बारामतीकर, कारवाई झालीच पाहिजे; पुणे अपघातप्रकरणी वडेट्टीवार आक्रमक

Pune Hit And Run Case: "सुनील टिंगरेंची चौकशी झाली पाहिजे. ही केस अत्यंत हाय प्रोफाईल झाली आहे. अपघातामधील गाडी तीन महिन्यापासून नोंदनी नसताना पुण्यातील रस्त्यांवर फिरत होती आणि ती कुठल्याही पोलिसाच्या निदर्शनास आली नाही ही बाब गंभीर आहे."
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama

Pune Porsche Car Accident News: कल्याणीनगर अपघात प्रकरणांमध्ये राजकीय दबाव आणला जात असल्याचा आरोप सातत्याने काँग्रेसकडून करण्यात येत आहे. अशातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी असतील त्या प्रत्येकावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे. (Kalyaninagar Accident)

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, कल्याणीनगर अपघात प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेप होत असून यावर आम्ही आक्षेप घेतला आहे. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. त्यांना वाचवणाऱ्यांना पण शिक्षा झाली पाहिजे. आरोपी श्रीमंत आहे, म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vijay Wadettiwar
Porsche Crash Case: तीनशे शब्दांचा निबंध भोवला; दोन डॉक्टरांच्या निलंबनानंतर तपासाची चक्रे आता बाल न्याय मंडळाकडे

या घटनेमागे राजकीय दबाव होता त्याचे पुरावे आहेत. घटना रात्री अडीच वाजता घडल्यानंतरही सकाळपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. या प्रकरणामध्ये पोलिस (Police) सुस्त असल्यामुळे गुन्ह्याची नोंद देखील नीट झालेली नाही. या प्रकरणात रक्ताचे नमुने बदलले गेले, त्यामुळे या सर्व प्रकरणांमध्ये संशय निर्माण झाला असून या सर्वांमागे राजकीय पाठबळ असण्याची शक्यता आहे.

त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून कारवाई व्हावी, तसंच या प्रकरणांमध्ये जो कोणी अडकला असेल, त्या प्रत्येकावरती कारवाई होणे आवश्यक आहे. मग तो राजकीय नेता असो, डॉक्टर असो वा पोलिस, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. ससूनमधील (Sasson) रक्त नमुन्यातील फेरफार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पल्लवी सापळे यांची नियुक्ती योग्य वाटत नसल्याचंही ते यावेळी म्हणाले. सामान्य लोकांना ससूनचा आधार वाटतो मात्र या प्रकरणामुळे ससूनचे नाव खराब झाले आहे. आम्ही या प्रकरणांमध्ये न्यायिक चौकशीची मागणी केली आहे. घटना घडल्यानंतर त्वरित कारवाई होत नाही.त्यामुळे यासाठी कोणाचा फोन आला होता? कोणी फोन केला होता त्यांनादेखील सहआरोपी केलं पाहिजे.

Vijay Wadettiwar
Sasoon Hospital News : 'तावरेंची नियुक्ती मुश्रीफ, टिंगरेंच्या पत्रावरूनच' ; ससूनच्या 'डीन'चा स्फोटक खुलासा!

तर यावेळी आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre) यांच्याकडून या प्रकरणांमध्ये राजकीय दबाव टाकण्यात आल्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्यावरती बोलताना वडेट्टीवार म्हणाले, "सुनील टिंगरेंची चौकशी झाली पाहिजे. ही केस अत्यंत हाय प्रोफाईल झाली आहे. अपघातामधील गाडी तीन महिन्यापासून नोंदनी नसताना पुण्यातील रस्त्यांवर फिरत होती आणि ती कुठल्याही पोलिसाच्या निदर्शनास आली नाही ही बाब गंभीर आहे. या प्रकरणांमध्ये पुणेकर असू दे नाहीतर बारामतीकर, तो राज्यातील नंबर एक, दोन अथवा तीन असू दे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com