आमदार सोनवणे म्हणतात 'खासदार आढळराव होणार केंद्रीय मंत्री' हे माझे तिसरे भाकित...

राजकीय हवा आणि त्याचा अंदाज सन 2014 पासून 'परफेक्ट' ओळखून आपली 'राजकीय मूव्ह' करणारे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी शिरूरच्या दौऱ्यात 'खासदार शिवाजीराव आढळराव पुन्हा मतांचा विक्रम करुन थेट केंद्रीय मंत्री होतील' असे भाकित केले आहे. आणि यापूर्वीची दोन भाकीते खरी झाल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिलाय.
Sharad Sonawne - Shivajirao Adhalrao
Sharad Sonawne - Shivajirao Adhalrao

शिक्रापूर : राजकीय हवा आणि त्याचा अंदाज सन 2014 पासून 'परफेक्ट' ओळखून आपली 'राजकीय मूव्ह' करणारे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी शिरूरच्या दौऱ्यात 'खासदार शिवाजीराव आढळराव पुन्हा मतांचा विक्रम करुन थेट केंद्रीय मंत्री होतील' असे भाकित केले आहे. आणि यापूर्वीची दोन भाकीते खरी झाल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिलाय.

विधायक कामांसाठी स्वतःची स्वाभीमान संघटना,  शिवसेना, उमेदवारी डावलली म्हणून मनसे आणि मनसेचे राज्यातील एकमेव आमदार असा प्रवास करून 'हवे'चा अंदाज घेवून पुन्हा शिवबंधनात अडकवून घेणारे सोनवणे हल्ली स्वतःला राजकीय भाकीतकार म्हणवून घेत आहेत. परवा शिरूर दौऱ्यात त्यांनी आपली महिन्यापूर्वीची दोन भाकिते सांगितली. त्यातील पहिले म्हणजे 'पवार साहेब माढ्यात उभे राहणार नाहीत. ' अन दूसरे म्हणजे 'पार्थ पवार मावळ मध्ये उभे राहतील.' आता 'ती' दोन्ही भाकीते खरी झाल्याचे सांगत त्यांनी आपले तिसरे राजकीय भाकित शिरूरकरांना सांगितले ते असे की, 'खासदार शिवाजीराव आढळराव यावेळी राज्यात विक्रमी मतांनी विजयी होतील अन मोदींच्या सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्रीही होतील.'

आपली विधानसभा निवडणूक सहा महिन्यांवर आली असताना राजकीय हवेचा 'रोख' ओळखून  इतरांची भाकीते सांगून ती खरी होत असल्याचे ते कितीही दाखले देत असले तरी, एकुणच युती आणि आघाडीचा अंदाज घेवून स्वतःच्या आमदारकीसाठी युतीच बरी हे भाकीत त्यांनी महिन्यापूर्वी हातात शिवबंधन बांधून जाहीर केले आहे. आपली निवडणूक दूर असल्याने सोनवणेंची भाकीतकार म्हणून सध्या चाललेली प्रचार-राळ मात्र मतदारांची चांगलीच करमणूक करतेय हे मात्र खरे..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com