चंद्रकांत पाटलांच्या बैठकीला तडीपार गुंडाने लावली हजेरी

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला एका तडीपार गुंडाने हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Pune DPDC Meeting
Pune DPDC MeetingSarkarnama

पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. १८ ऑक्टोबर) पुणे जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक झाली. पुणे (Pune) विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीला एका तडीपार गुंडाने उपस्थिती लावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Tadipar Gund attended Chandrakant Patil's meeting)

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला एका तडीपार गुंडाने हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रदीप बाजीराव जगताप असे या गुंडाचे नाव आहे. जगताप याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेले आहे.

Pune DPDC Meeting
अंधेरीच्या माघारीतून फडणवीसांचा आशिष शेलारांवर नेम?

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पालकमंत्री पाटील यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रेय भरणे, महादेव जानकर यांच्यासह विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि मान्यवरांची हजेरी होती. जगताप याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेले आहे. तरीही तो पालकमंत्र्यांच्या बैठकीला कसा काय उपस्थित होता, असा सवाल उपस्थित होत आहे.

Pune DPDC Meeting
काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीच्या मतदानाला दांडी मारणारे महाराष्ट्रातील ‘ते’ १९ जण कोण?

दरम्यान, तडीपार गुंड प्रदीप जगताप हा पुण्यातील असल्याची माहिती सासवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांना मिळाली होती. जगताप याच्या मागावर सासवडचे पोलिस पथक होते. जगताप हा पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित आहे, अशी माहिती पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना मिळाली होती. त्यांनी पोलिसांना जगताप यास ताब्यात घेण्याची सूचना केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Pune DPDC Meeting
...तर भाजपचा मोठा पराभव झाला असता : जयंत पाटील यांनी केला दावा

तडीपार प्रदीप जगताप हा पुरंदर तालुक्यातील सासवडचा असून तो एक स्थानिक चॅनेल चालवत होता. त्याच्यावर पुरंदर तालुक्यातील नागरिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांकडून खंडणी उकळण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com