Aditya Thackeray : 'महाविकास आघाडीचं सरकार आल्यास 'या' प्रकल्पाला स्थगिती देणंच योग्य राहील'; आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं!

Aditya Thackeray on Pune Project : पुण्यातील पूर परिस्थिती बाबत मी राजकीय नेता म्हणून नाही तर नागरिक म्हणून बोलतोय. कारण राजकारण बाजूला ठेवून यावर अभ्यास करणे आवश्यक आहे. असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
Aditya Thackeray
Aditya Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Aditya Thackeray in Pune News : खडकवासला धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पुण्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. या पूर बाधित भागाला विविध राजकीय नेते आता भेटी देत आहेत. सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूरबाधितांची भेट घेतल्यानंतर मंगळवारी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पूर बाधितांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) म्हणाले, 'पुण्यातील पूर परिस्थिती बाबत मी राजकीय नेता म्हणून नाही तर नागरिक म्हणून बोलतोय. कारण राजकारण बाजूला ठेवून यावर अभ्यास करणे आवश्यक आहे. सगळे राजकीय लोकांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. जेणेकरून नागरिकांची या पुराच्या समस्येतून सुटका करता येईल.'

तसेच 'गुजरातमध्ये साबरमती रिव्हर फ्रंट प्रकल्प यशस्वी झाला त्यामुळे आता त्याच पद्धतीचा प्रकल्प पुण्यामध्ये कॉपी-पेस्ट केला जात आहे. मात्र त्या ठिकाणी यशस्वी झालेला प्रकल्प पुण्यात देखील यशस्वी होईलच याची शाश्वती नाही. याबाबत अधिक गांभीर्याने अभ्यास करणे आवश्यक आहे.'

Aditya Thackeray
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा मनसेवर एकच वार; म्हणाले, पावसाळ्यात छत्र्या तशी निवडणुकीत...

'राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मी पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती दिली होती. मात्र प्रकल्पाबाबत गोंडस असा प्रेझेंटेशन मला देण्यात आलं त्यानंतर आमच्याकडून या प्रकल्पाला सहमती देण्यात आली. मात्र सध्याची पूर परिस्थिती पाहता या नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती देणं योग्य आहे, असं मला वाटत आहे. महाविकास आघाडीचे(Mahavikas Aghadi) सरकार आल्यास या प्रकल्पाला स्थगिती देणं योग्य राहील असं मला वाटतं.' असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

Aditya Thackeray
Video Raj Thackeray : "याला सरकार चालवणे म्हणतात का?" राज ठाकरे भडकले

तसेच 'या नदीत सुधार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार का असं विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले, ज्यांना कळतं त्याच्याशी चर्चा करू, मात्र कॉन्ट्रॅक्टर भाषा मात्र कळत नाही.' असा खोचक टोला त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com