Aaditya Thackeray News : '...म्हणून पुण्यात पर्यावरणप्रेमींनी जनआंदोलन उभारावे'; आदित्य ठाकरेंची सूचना!

Aaditya Thackeray at Pune : 'पुणेकरांच्या हिताच्या योजना रखडविल्या जात असून दुसरीकडे...' असंही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
Aaditya Thackeray
Aaditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : शहरात सुरू असलेल्या मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरूज्जीवन आणि सुशोभिकरण योजनेसाठी लाल आणि निळी पूररेषा बदलली आहे. शहरात सुरू असलेल्या या योजनेमुळे नदीवरील चार पूल पाण्याखाली जाणार आहेत. राज्य पर्यावरणीय मूल्यांकन प्रभाव समितीने त्याला मंजुरी नाकारली होती.

मात्र असे असतानाही या योजनेचे काम दामटले जात आहे. शहरासाठी ही योजना धोकादायक ठरणार असल्याने शहराला वाचविणार की नाही? याचा जाब सर्वच राजकीय पक्षांना विचारावा लागणार आहे, असे माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

माजी मंत्री आदित्य ठाकरे रविवारी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. शहरात सुरू असलेल्या या योजनेमुळे वाटोळं होणार आहे. त्यामुळे ही योजना थांबविण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी जनआंदोलन उभारावे, अशी सूचना त्यांनी केली.

पुणे महापालिकेने नदीकाठ संवर्धन, पुनरूज्जीवन आणि सुशोभीकरण योजना हाती घेतली आहे. ही योजना पाच हजार कोटींची आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना या योजनेमुळे होणाऱ्या नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेत या योजनेला पर्यावरणीय मंजूरीही नाकारण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही योजनेचे काम सुरू ठेवण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Aaditya Thackeray
Aditya Thackeray Vs Eknath Shinde: अमावस्या, पौर्णिमेला मुख्यमंत्री शेती करायला जातात; ठाकरेंनी उडवली खिल्ली

या पार्श्वभूमीवर ‘पुणे रिव्हर रिव्हायव्हल’ या संस्थेच्या वतीने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करण्यात आली. त्यासाठी ठाकरे पुण्यात आले होते. ही योजना नागरिकांच्या की गुजरात येथील ठेकेदाराच्या हिताची आहे? असा प्रश्नही देखील ठाकरे यांनी उपस्थित केला. पर्यावरणप्रेमी सारंग यादवाडकर आणि विवेक वेलणकर यांनी यासंदर्भातील सादरीकरण ठाकरे यांच्यापुढे केले. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार ॲड. वंदना चव्हाण यावेळी उपस्थित होत्या.

पुणेकरांच्या हिताच्या योजना रखडविल्या जात असून दुसरीकडे धोकादायक योजनांची कामे वेगाने केली जात आहेत. अलीकडे शहरे भकास होत आहेत. ही योजना राबविताना पुणेकरांना विश्वासात घेतले गेले नाही. नदीपात्राच्या दोन्ही बाजूला भराव टाकून पात्र लहान करण्यात आले आहे. जगातील विविध शहरांमध्ये नदीचे पात्र रूंद करून त्याची खोली वाढविली जात असताना पुण्यात मात्र नदीपात्रात भराव टाकून सिमेंट काँक्रिटचा भराव टाकला जात आहे.

Aaditya Thackeray
Supriya Sule News : ...तर आम्ही फडणवीसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

शिवाय या योजनेच्या माध्यमातून गुजरातमधील ठेकेदार, सल्लागाराचा विकास महापालिका करत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर त्याचा जाब सत्ताधारी आणि राजकीय पक्षांना विचारावा लागेल, असेही ठाकरे म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com