Supriya Sule News : ...तर आम्ही फडणवीसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

Crime News : कुरकुंभ येथे इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जची निर्मिती होत असेल आणि त्याची माहिती पोलिसांना मिळत नसेल तर हे पोलिसांचे मोठे अपयश आहे.
Devendra Fadnavis-Supriya Sule
Devendra Fadnavis-Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Pune News : देशातील अनेक राज्यांमध्ये ड्रग्जचा व्यापार वाढत असून तरुण पिढी ड्रग्जच्या आहारी जात आहे, हे अत्यंत घातक आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात ज्या पद्धतीने ड्रग्जचा साठा सापडत आहे, त्यावरून 'उडता पंजाब' नंतर आता 'उडता महाराष्ट्र' अशी अवस्था राज्याची करायची आहे काय? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार विचारला. (Pune Drugs Case)

राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करण्याचे घोषणा केली होती. फडणवीस केवळ घोषणा न करता ठोस भूमिका घेणार असतील तर आम्ही सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेऊन त्यांना मदत करू, त्यांच्या मागे उभे राहू, असे खासदार सुळे यांनी जाहीर केले. खडकवासला मतदारसंघातील प्रश्न समजावून घेत त्यावर तोडगा काढण्यासाठी खासदार सुळे यांनी या भागात भेट देत नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांची संवाद असताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. (Devendra Fadnavis)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis-Supriya Sule
Jalgaon News: राजकारणात छापा-काटा होईल, कुस्ती होईल तेव्हा पाहू...; गुलाबरावांनी विरोधकांना सुनावलं

पुणे पोलिसांनी गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला. याची पाळेमुळे लंडनपर्यंत पोहोचलेली आहेत. लोकसभेत अनेक राज्यांचे खासदार ड्रग्जच्या विषयावर नेहमी बोलत असतात. महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडणे, हे धोकादायक आहे, यावर आत्ताच भूमिका घेणे गरजेचे आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना आई, नागरिक म्हणून विनंती ड्रग्जबाबत तुम्ही ठोस भूमिका घेणार असाल तर आम्ही राजकीय मतभेद बाजूला ठेऊन तुम्हाला मदत करू, असे सुळे म्हणाल्या. कुरकुंभ येथे इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जची निर्मिती होत असेल आणि त्याची माहिती पोलिसांना मिळत नसेल तर हे पोलिसांचे मोठे अपयश आहे, असेही त्या म्हणाल्या.

पवारांचं नाव घेतलं की हेडलाईन होते

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हाचे अनावरण करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे शनिवारी रायगड येथे गेले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे. चाळीस वर्षांनंतर पवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आली, अशी टीका या नेत्यांनी केली. याबाबत खासदार सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, काय का असेना हेडलाईन्स झाली ना? पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय हेडलाईन्स होत नाही, हे सर्वांना माहित आहे. तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे.

Devendra Fadnavis-Supriya Sule
Modi's Yavatmal Tour : भावनाताई आपली कामेही सांगणार की केवळ ‘मोदी है तो मुमकीन है’चे गुण गाणार?

फडणवीसांनी धनगर, मराठा समाजाची फसवणूक केली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती येथे येऊन धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यांनी धनगर समाजाबरोबर आता मराठा समाजाची ही फसवणूक केली आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मराठा समाजाने प्रचंड संघर्ष आरक्षणासाठी केला आहे. मात्र, राज्यकर्त्यांनी त्यांची फसवणूक केली आहे. लोकसभेच्या जागेच्या संदर्भात पुढच्या आठवड्यात निर्णय होईल, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.

Edited By : Vijay Dudhale

Devendra Fadnavis-Supriya Sule
Shrikant Shinde : "CM शिंदेंनी माझ्याविरोधात लढावे", ठाकरेंच्या आव्हानावर श्रीकांत शिंदे म्हणाले, "आपली..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com