तळेगाव ढमढेरे (जि. पुणे) : पुणे जिल्हा सहकारी दूध संघाच्या (कात्रज) अध्यक्षपदाचा केशरताई पवार यांनी राजीनामा दिला आहे, त्यामुळे कात्रजच्या अध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. त्यात शिरूर तालुक्यातील ॲड. स्वप्नील ढमढेरे यांचे नावही चर्चेत आहे. मात्र, कात्रजच्या अध्यक्षपदाचा निर्णय विरोधी पक्षनेते अजित पवार हेच घेणार आहेत, त्यामुळे ते कोणाला संधी देतात, याकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (Adv. Swapnil Dhamdhere Will get a chance to president of Katraj Dudh Dairy?)
ॲड.स्वप्नील ढमढेरे हे कात्रजचे (Katraj Dairy) माजी संचालक बाळासाहेब ढमढेरे यांचे पुत्र आहेत. ते शिरूर तालुक्यातील अ वर्गाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. स्वप्निल ढमढेरे यांचे वडील बाळासाहेब ढमढेरे हे जिल्हा दूध संघावर (Dudh Sangh) सलग सुमारे ३५ वर्ष संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांना अनेकदा अध्यक्षपदाने (Chairman) हुलकावणी दिली आहे. त्यामुळे वडिलांना मिळालेली हुलकावणी मुलगा साधणार का, असा प्रश्न शिरूरमधून विचारला जात आहे.
आंबेगाव विधानसभेला जोडलेल्या शिरूर (Shirur) तालुक्यातील ३९ गावांतील केशरताई पवार यांना सर्वानुमते अध्यक्षपद देण्यात आले होते. आता तळेगाव ढमढेरे येथील स्वप्निल ढमढेरे यांच्या रूपाने ते शिरूर तालुक्याला मिळणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
स्वप्निल ढमढेरे यांच्याकडे अध्यक्षपद मिळविण्यासाठी आमदार ॲड.अशोक पवार यांना महत्वाची भूमिका निभाववी लागणार आहे, तरच ते शक्य आहे. पण, विरोधी पक्षनेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील , खासदार सुप्रिया सुळे व डॉ.अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार व इतर नेतेमंडळी अध्यक्षपदी कोणाला संधी देतात, हे पहावे लागणार आहे.
दरम्यान, स्वप्निल ढमढेरे हे जिल्हा दूध संघावर शिरूर तालुक्याचे अ वर्गातून प्रतिनिधित्व करीत आहेत. जुन्नर पाठोपाठ सर्वात जास्त दूध संकलन करणारा तालुका म्हणून शिरूर ओळखला जातो.
प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्या माध्यमातून बारामती मतदारसंघाकडे पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे कात्रज दूध संघाचे अध्यक्षद कायम राहणार का. तसेच, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार त्यासाठी किती जोर लावतात यावर अध्यक्षपद शिरूरला मिळणार की इतर तालुक्याकडे जाणार हे ठरणार आहे.
कात्रजचे १ लाख ८६ हजार लिटर दुधाचे दैनंदिन संकलन
दरम्यान, जिल्हा दूध संघाकडे पुणे जिल्ह्यातून जुन्नर तालुक्यातील गाईचे दूध सर्वाधिक (४७ हजार लिटर) आणि त्या खालोखाल शिरूर तालुक्यातून (४१, ३०० लिटर) दौंड तालुक्यातून (२७ हजार लिटर) आंबेगाव तालुक्यातून (२३ हजार लिटर) खेड तालुक्यातून (१२७०० लिटर) गाईचे दूध संकलित होत आहे. उर्वरित तालुके दहा हजार लिटरच्या आत गायीचे दूध संकलित करतात. पुणे जिल्ह्यातील एकूण बारा तालुक्यातून १ लाख ७९ हजार २०० लिटर गाईचे दूध जिल्हा दूध संघाकडून दररोज संकलित होत आहे. तसेच, पुणे जिल्ह्यातून ७ हजार ६८० म्हशीचे दूध संकलित होत आहे. पुणे जिल्ह्यातून गाई व म्हशीचे एकूण १ लाख ८६ हजार ८८० लिटर दूध जिल्हा दूध संघाला संकलित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.