Pune News : राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर रिक्षा संघटनांचे पदाधिकारी आपसातच भिडले

Pune News : पुण्यातील निवासस्थानाबाहेर घडला प्रकार
Raj Thackeray, Pune News
Raj Thackeray, Pune NewsSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवेला विरोध या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) आणि पुण्यातील रिक्षाचालकांनी काल (ता.२८) संप केला. आंदोलन करीत त्यांनी पुणे आरटीओ कार्यालयावर रिक्षांचा धडक मोर्चा काढून चक्काजाम केले. त्यानंतर त्यांनी पुणे येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज भेट घेतली, त्यानंतर दोन संपकरी संघटना पदाधिकाऱ्यांतील मतभेद समोर आले.

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील बारा रिक्षा संघटनांनी एकत्र येत सोमवारी आंदोलन केले. त्यातील महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष पिंपरी-चिंचवडकर बाबा कांबळे (Bala Kamble) आणि पुण्यातील बसतोय रिक्षावाला संघटनेचे केशव क्षीरसागर यांच्यातील मतभेद पुण्यातील राज यांच्या राजमहल निवासस्थानातील भेटीनंतर समोर आले.

Raj Thackeray, Pune News
`राष्ट्रवादी`ला धक्का... पक्षाच्या माजी नगरसेविका वैशाली दाणी शिंदे गटात

महत्वाचे मुद्दे राज यांच्यासमोर मांडू दिले नाहीत, तसेच इतर रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनाही बोलण्याची संधी न दिल्याने कांबळे हे क्षीरसागरांवर चर्चा करून बाहेर पडताच संतापले. दरम्यान, आम्ही फक्त प्रश्न सोडवायलाच असतो, अशी मिश्कील टिपण्णी या चर्चेदरम्यान राज यांनी केली.

Raj Thackeray, Pune News
'वेदांता-फॉक्सकॉन' प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंनी समोरा-समोर येवून चर्चा करावी; आदित्य ठाकरेंचे आव्हान

क्षीरसागरांशी मतभेद झाल्याची कबुली कांबळेंनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली. राज हे आमच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहेत, असे ते म्हणाले. मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, त्यांच्या वाहतूक आघाडीचे अध्यक्ष किशोर चिंतामणी तसेच शिवाजी मते हे सोमवारच्या रिक्षा संघटनांच्या आंदोलनात सामील झाले होते. त्यांनी पाठिंबा दिला होता. म्हणून पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांच्याशी त्यांनी चर्चा करण्यास आंदोलक रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींना बोलावले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com