Devendra Fadnavis & Girish Bapat : कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारातून पुण्याचे खासदार आणि कसबा मतदारसंघात पाचवेळा आमदार राहिलेले गिरीश बापट यांनी अचानक माघार घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. यानंतर बापट नाराज असल्याच्या चर्चांही पुण्याच्या राजकारणात झडू लागल्या होत्या. मात्र, यानंतर देवेंद्र फडणवीसांनी बापटांची भेटली होती. या भेटीनंतर कसब्याचे किंगमेकर पुन्हा एकदा मैदानात उतरले असून बापट प्रचारात अॅक्टिव्ह होण्याची शक्यता आहे.
खासदार गिरीश बापटांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारातून माघार घेतल्याचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे सांगितले होते. कसब्याचे 'किंगमेकर' म्हणून ओळख असणाऱ्या बापटांनीच ऐनवेळी कसबा पोटनिवडणुकी(Kasba By Election)च्या प्रचारातून माघार घेतल्यानं भाजपचं टेन्शन वाढलं होतं. मात्र, त्यानंतर काहीच वेळात फडणवीसांनी बापटांची भेट घेतली.
मागील काही दिवसांपासून गिरीश बापट(Girish Bapat) आजारी असल्याने त्यांची फडणवीसांनी भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ''बापटसाहेब आमचे नेते आहेत. त्यांना कसबा मतदारसंघाची काळजी आहे. कसबा मतदारसंघात प्रचार कसा केला पाहिजे. या संदर्भात बापटांनी मला टिप्स दिल्या आहेत. त्यांचे लक्ष या निवडणुकीकडे आहेच. मला वाटतंय कसबा असो किंवा चिंचवड भाजप दोन्ही ठिकाणी निवडून येईल असं फडणवीस म्हणाले.
फडणवीसांच्या भेटीनंतर बापट मैदानात...
खासदार गिरीश बापटांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारातून माघार घेतल्याचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे सांगितले होते. मात्र, देवेंद्र फडणवीसां(Devendra Fadnavis)च्या भेटीनंतर आजारी असतानाही बापट आज कसबा पोटनिवडणुकीसाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे. ते सायंकाळी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
तसेच केसरीवाड्यात या ठिकाणी पदाधिकारी यांना मार्गदर्शन करणार किंवा ऑनलाईन मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. कसबा पोटनिवडणूक जिंकण्यात गिरीश बापटांची भूमिका महत्वाची असणार आहे.
कसबा पेठ मतदारसंघातून ते पाचवेळा बापट हे आमदार राहिले आहेत. त्यामुळे कसब्यात गिरीश बापट यांचं मोठं वर्चस्व आहे. जर यावेळी गिरीश बापट नाराज असतील तर याचा फटका भाजपला बसणार हे निश्चित आहे. बापट कसबा समीकरण ओळखूनच फडणवीसांना तातडीने त्यांची भेट घेतली होती. या भेटीत फडणवीसांनी बापटांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
बापटांच्या नाराजीचं नेमकं कारण काय ?
कसबा विधानसभेसाठी गिरीश बापट हे आपल्या सुनेला उमेदवारी देण्यासाठी आग्रही असल्याची देखील बातमी आली होती. पण हेमंत रासनेंना उमेदवारी जाहीर झाल्यानं बापट नाराज असल्याची चर्चा आहे. तसं न झाल्यानं गिरीश बापट प्रचारापासून लांब आहेत अशी चर्चा होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.