
Pune News : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून उरुळी कांचनजवळ निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. याप्रकरणी त्यांची पत्नी आणि तिचा प्रियकर यांना पोलिसांनी अटक केली होती. यानंतर पुण्याला हादरवणारं आणखी असंच एक हत्याकांड उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यातील (Pune) लोणी काळभोर परिसरात अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्यानं पतीचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत पत्नीनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या डोक्यात फावडा घालत त्यांचा खून केला. रवींद्र काशिनाथ काळभोर असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या तीन तासात पत्नी शोभा रविंद्र काळभोर आणि तिचा प्रियकर गोरख त्र्यंबक काळभोर यांना अटक केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या तीनच तासांत या घटनेचा छडा लावत पत्नी शोभा रविंद्र काळभोर आणि तिचा प्रियकर गोरख त्र्यंबक काळभोर यांना बेड्या ठोकल्या आहेत. रवींद्र यांचे भाऊ भाऊसाहेब काशिनाथ काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद काळभोर शेती करून घर सांभाळतात होते, त्यांना एक मुलगा व एक मुलगी असा परिवार होता. मंगळवारी सकाळी रवींद्र काळभोर हे घराबाहेरील असलेल्या पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडून आल्याचे दिसून आले. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रायवाडी भागात मंगळवारी सकाळी 7 वाजता घडल्याची माहितीही पोलिसांनी यावेळी दिली आहे.
शोभा काळभोर यांचे गोरख काळभोर यांच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना (Police) मिळाली. अनैतिक संबंधात अडसर होत असल्याने रवींद्र यांचा कायमचा काटा काढायचा आरोपींनी कट रचला होता.
रवींद्र काळभोर हे सोमवारी (ता.31) रात्री अकरा वाजण्याच्या सुमरास त्यांच्या घराबाहेरील पलंगावर झोपलेले होते.यावेळी रात्रीचा फायदा घेत दोन्ही आरोपींनी संगनमत करून त्याच्या डोक्यात फावड्यानं घाव घालत खून केला. लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत या प्रकरणाचा तपास करत पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.