Ajit Pawar : अजितदादांची खदखद अन् 'गब्बर'चा बारामतीकरांना सवाल; वहिनींना पराभूत केलं आता...

Ajit Pawar Baramati Assembly Election 2024 : अजितदादांनी बारामतीत कार्यकर्त्यांसमोर खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर 'गब्बर'च्या नावानं एक पत्र व्हायरल झालं आहे.
sunetra pawar | ajit pawar
sunetra pawar | ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

अनेक वर्षे राजकीय स्थितंतरापासून दूर राहिलेल्या बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल पाहायला मिळत आहे. सध्याच्या राजकीय स्थितीवर उघड-उघढ भाष्य करणं टाळत कार्यकर्ते आणि पदाधिकारी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मन मोकळे करताना दिसत आहेत.

असंच एक 'गब्बर'च्या नावाने पत्र सध्या बारामती परिसरात व्हायरल होत आहे. या पत्रातून 'गब्बर'ने बारामतीकरांना काही सवाल केले आहेत. आधी वहिनींना पराभूत केलं आता दादांना पाडायचे का? असा प्रश्न 'गब्बर'ने विचारला आहे.

रविवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ( Ajit Pawar ) हे बारामती दौऱ्यावर होते. "विकास कामे करूनही निवडणुकीत गंमत होणार असेल, तर न उभे राहिलेलं बरं. झाकली मूठ सव्वा लाखाची राहिलेली बरी. मी पहिल्यापासून लाखाच्या मताधिक्यानं निवडून येत होतो. आता मी 65 वर्षांचा झालो, समाधानी आहे. जिथं पिकतं तिथे विकलं जात नाही. मी सोडून दुसरा कोणी तरी आमदार बारामतीकरांना मिळाला पाहिजे. मग तुम्ही माझी 1991 ते 2024 या कालावमधीतील तुलना त्यांच्यावर केल्यावर काय ते लक्षात येईल," अशी खदखद अजितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली होती. यानंतर 'गब्बर'चं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

या पत्रातून बारामतीतील राजकीय वातावरणासंदर्भात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या पत्रात बारामतीतील नेत्यांच्या कुटुंबातील अंतर्गत संघर्ष आणि स्थानिक नेत्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा, यावर सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

नेमकं काय लिहिले पत्रात?

वहिनींना पराभूत केलं, आता दादांना पाडायचय काय ? बाप-लेकांच्या मनात चाललंय तरी काय?

नमस्कार बारामतीकर...!

अनेक वर्षे झाली बारामतीकर साहेब, दादा, ताई, यांच्यावर प्रेम करतात. मतदान रूपी आशीर्वाद देतात. मग देशात, राज्यात, जिल्ह्यात साहेब, दादा, ताई हे आपल्या कर्तृत्त्वाच्या आणि विकासाच्या जोरावर ठसा उमटवतात.

मात्र, सर्वांना माहिती आहे सध्याचे राजकीय वातावरण भलतच गढूळ झालं आहे. स्थानिक नेत्यांना भलतीच स्वप्ने पडू लागली काय? साहेबांचं नाव पुढं करून दादांचा काटा काढायचाय की काय?

sunetra pawar | ajit pawar
Rohit Pawar : 'विचार सोडला म्हणून अजितदादांना धोका मिळाला', रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

मित्रांनो हे सर्व प्रश्न म्हणजे बारामतीकरांच्या मनातील कुजबूज आहे. जी भीतीपोटी जोराने बोलली देखील जात नाहीत. जो बोलेल तो मुस्लिम असला तर आतंकवादी, दलित असला तर नक्षलवादी, ओ.बी.सी. असला तर देशद्रोही अशी चर्चा तर कसब्यापासून-आमराईपर्यंत ऐकायला मिळते. म्हणूनच हा पत्रव्यवहार बारामतीकरांशी.

बापाने ताईंचा प्रचार प्रमुख राहून साहेबांचा निष्ठावान असल्याचे दाखवून दिले, जंगजंग पछाडून तरूणाईला लाजवेल, असा प्रचाराचा रंग मिशीवर ताव देवून बारामतीकरांना दाखवला. एवढ्यावरती आपल्याला मिळालेली सत्ता, सत्तारूपी ताकद, व त्या ताकदीने समुद्रमंथन करीत मिळवलेली आर्थिक साम्राज्य याच्या जोरावर पूर्वी फक्त कसब्यामध्ये व दलितवस्तीमधील दलित चळवळ संपवून स्वतःचे राजकीय वर्चस्व वाढवले व स्वतःच्या मुलांना, पुतण्यांना राजकीय राजवटीचा वारसा वाटून मोकळे झाले. मात्र, या निवडणुकीत पुरस्कार विजेते नटसम्राटही झाले

मात्र, मुलांनी याच मिळालेल्या वारसाचा वापर करीत दादांचा विश्वास संपादन केला, बँकेचे अध्यक्षपद, नियोजन समितीचे सदस्यपद, बारामतीचे गटनेते पद मिळवत दादांच्या गळ्यातील ताईत झाला. मात्र, दादांचा प्रचार करण्याच्या नावाखाली तोंड (जाती) बघून पैशांचे वाटप केले. समाजात, जनमाणसात पैशांवरून संभ्रम निर्माण केला दादांचा प्रचार करण्याच्या नावाखाली बाहेरून घड्याळ व आतून 'तुतारी' वाजवली.

sunetra pawar | ajit pawar
BJP Vs NCP (SP) : भाजपला धक्का! मोठा नेता हाती घेणार तुतारी, विधानसभेसाठी ठोकला शड्डू

आजपर्यंत अशाच नुरा-कुस्त्या करून बारामतीकरांच्या भावनेला ढाक लावून पाडले. तर दोन्हींकडून मलिदा खात मतदारांची आजतागायत फसवणूक केली. मात्र, आतातर मजल एवढी मारली की, चक्क नेत्यांचीही फसवणूक केली. हीच तर खरी मलिदा गँग. वहिनींना पाडून कोणता हेतू साध्य केला? की आता दादांच्या मागे लागलात.

जशी बारामती नगरपरिषद निवडणुकीत भाऊ-भावांची लढाई प्रतिष्ठेची दाखवून कसबेकरांची फसवणूक केली. तशी आता बाप-लेकांची लढाई दाखवून नेमकी बारामतीची फसवणूक करता की, साहेब, दादा, ताई यांची फसवणूक करता? का साहेब, दादा, ताई यांच्यातच नुरा कुस्ती सुरू आहे ती भाजप, शिंदेंची का काँग्रेस, ठाकरेंची दिशाभूल करण्याकरीता.

आपला, 'गब्बर'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com