कारवाई मागे घेतल्यानंतर आढळराव पाटील शिवसेनेत थांबणार की नाही ?

Shivsena| Shivajirao Adhalrao Patil| शिवाजीराव आढळराव यांची शिवसेनेतून केलेली हकालपट्टीची कारवाई तात्काळ मागे घेतली गेली
Shivajirao Adhalrao Patil|
Shivajirao Adhalrao Patil|
Published on
Updated on

भरत पचंगे

शिक्रापूर : शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांची शिवसेनेतून (Shivsena) केलेली हकालपट्टीची कारवाई तात्काळ मागे घेतली गेली. तसा फोन थेट मातोश्रीवरुनच आढळराव यांना आल्याची माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली. अर्थात सदर वृत्त सामना'मध्ये अनावधानाने छापल्याचे शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी एका पत्राद्वारे जाहीर केले आहे. दरम्यान या संपूर्ण हकालपट्टी बाबत व हकालपट्टी मागे घेतल्याच्या प्रकरणाबाबत व आपल्या पुढील राजकीय भूमिकेबाबत लवकरच आपण थेटपणे जाहीर बोलणार असल्याचे आढळराव पाटील यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.

शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या शिवसेनेतील हकालपट्टीच्या सामन्यातील बातमीने आज सकाळपासूनच जिल्ह्यातील राजकारणात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. याबाबत आजच दुपारी एक वाजता पत्रकार परिषदेत खुलासेवार बोलणार असल्याचे आढळराव यांनी जाहीर केल्यानंतर त्यांना थेट मातोश्रीवरुन फोन सुरू झाल्याची माहिती आढळराव यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. मात्र हे सर्व चुकून झाले आहे, अशी कारवाई एवढ्या जेष्ठ उपनेत्यावर कशी होवू शकते आणि त्याचे वृत्त सामनात कसे प्रसिध्द होवू शकते यावर उलटसुलट बोलले गेले. मात्र अशी कुठलीही कारवाई झालेली नसून तसे पत्र शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी जारी केले व तसे ते आढळराव यांच्या कार्यालयाकडेही पाठविण्यात आले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमिवर आता आपण स्वत: स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे आढळराव यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.

Shivajirao Adhalrao Patil|
शिवसेना कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज व्हावे!

याबाबत आढळराव यांचेशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या कृपेने आपण तीन वेळा खासदार झालो. मात्र ज्यांच्या विरोधात लढून खासदार झालो त्या राष्ट्रवादीनेच आपला पराभव केला आणि त्याच राष्ट्रवादीसोबत महाआघाडी करुन माझ्यासह जिल्ह्यातील शिवसैनिकांना अक्षरश: गेली अडीच वर्षे हैरान केले गेले. हीच वास्तव भूमिका मी बोलत आलो. याच पार्श्वभूमीवर काल (ता.२) रात्री उशिरा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा स्वत:हून फोन आला होता

पक्षसंघटनेबाबत अनेक विषयांवर ते बराच वेळ बोललेही. मात्र सकाळी सामनात आलेल्या वृत्तामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाली. दरम्यान माझी हकालपट्टीची सामनातील बातमी, त्यानंतर हकालपट्टी मागे घेतल्याचे पत्र आणि एकुणच राज्यातील घडामोडींबद्दल आपण आता काही गोष्टी लवकरच स्पष्टपणे बोलणार असून आपली पुढील राजकीय भूमिकाही स्पष्ट करणार आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com