Pune MPSC Protest : MPSC परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचे भाजप आमदाराला संतापजनक पत्र...

Pune Mpsc Protest Abhimanyu Pawar : MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर विद्यार्थ्यांनी नाराजी आणि संताप व्यक्त करणारे पत्र भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना लिहिले आहे.
Pune MPSC Protest
Pune MPSC ProtestSarkarnama
Published on
Updated on

Pune News : MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना याबाबत सुनवणारे पत्र समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले आहे.

'तुम्ही चक्रव्यूवहातून तुम्ही बाहेर या, आम्हाला त्यात टाकू नका', अशा मथळ्याखाली स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे पत्र आमदार अभिमन्यू पवार यांना लिहिले आहे.

पुण्यात MPSC परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन कशासाठी होते, याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी घ्यायला पाहिजे होती. हे आंदोलन राजकीय असल्याची टीका देखील अभिमन्यू पवार यांनी केली होती. आंदोलनातील 80% विद्यार्थी MPSC ची एकत्रित जाहिराती येईल आणि जागा वाढेल यासाठी आंदोलनाला जमली होती. परीक्षा पुढे ढकलण्यासाठी आंदोलन नव्हते. MPSC आणि IBPS चा कोठेही संबंध नाही. जागा वाढीचा मुद्दा होता, ना की संविधानात्मक संस्थेवर दबाव आणून परीक्षा पुढे ढकण्याचा. जागा वाढीसाठी आंदोलन असल्याचे टेलिग्राम या समाज माध्यमांवर संदेश होते. या मुद्यावर विद्यार्थी गोळा झाले होते. परंतु अभिमन्यू पवार यांनी हा मुद्दाच लक्षात घेतला नाही, असा संताप या पत्रात व्यक्त केला आहे.

Pune MPSC Protest
MPSC Aspirants Protest : MPSC ची माघार, पण विद्यार्थ्यांचा आक्रोश कायम; आता एकच मिशन...नोटीफिकेशन

भाजप (BJP) आमदार अभिमन्यू पवार यांनी आंदोलन कोणत्या मुद्यावर चालले होते, याची माहिती होती हा प्रश्न पत्रात उपस्थित केला आहे. अभिमन्यू पवार अभ्यासू आमदार आहेत, असे म्हणत त्यांना अपुरी माहिती देणारे कोण होते? याचा पाठपुरावा करण्याचा सल्ला पत्रात दिला आहे. तसंच परीक्षा पुढे गेल्याने दोन-तीन महिन्यांचा खर्चाचा प्रश्न अभ्यासासाठी पुण्यात जमलेल्या विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे. आयोगाने आधीच परीक्षा घेऊन लिंक ओपन करण्याचा पर्याय दिला होता, पण तुम्ही विद्यार्थ्यांना समजावण्यापेक्षा तुम्ही आयोगावर दबाव टाकत बसलात. कृषी मुलं आंदोलनात नव्हती. पण तुम्ही कृषीचा मुद्दा धरून ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी आयोगावर दबाव आणला, असा आरोप या पत्रात केला आहे.

Pune MPSC Protest
Sharad Pawar: MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात; '..तर मी स्वत: आंदोलनात उतरेन'

संविधानिक संस्थेवर दबाव आणण्यापेक्षा ती अधिक मजबूत होऊन कसे काम करेल, यासाठी प्रयत्न हवे होते, अशा शब्दांमध्ये अभिमन्यू पवार यांना पत्रात सुनावले आहे. लोकसभा निवडणुकीत काय झाले, याची आठवण करून देत, संविधान बदलण्याचा मुद्दा गाजतो आहे, तो तुमच्या अशा कृतीमुळेच, असे सांगून ते तुमच्या कृतीतून अधिक दाखवून दिले, असा संताप देखील कम्बाइनची तयारी करणारे विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

रोहित पवारांची भूमिका

या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील भेट दिली होती. या आंदोलनात आमदार रोहित पवार देखील सहभागी झाले होते. ते रात्रभर मुलांच्या बरोबरच आंदोलनाला बसले आहे. MPSC ने काढलेले परिपत्रकात चार महिन्याची मुदत दिलेली आहे. ती मुदत आम्हाला मान्य नाही. ती मुदत एक ते दीड महिनापर्यंत देण्यात यावी, अशी मागणी आमदार पवारांनी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com