MPSC Aspirants Protest : MPSC ची माघार, पण विद्यार्थ्यांचा आक्रोश कायम; आता एकच मिशन...नोटीफिकेशन

MPSC Exam Postponement News Pune : विद्यार्थी अद्यापही आंदोलनावर ठाम असून जोपर्यंत सर्वच्या सर्व मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे.
MPSC student Protest.
MPSC student Protest.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्याने पुण्यात एमपीएससीच्या (MPSC)विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. त्यानंतर ही परीक्षा पुढे घेण्याचा निर्णय बैठकीनंतर घेण्यात आला असला तरी विद्यार्थ्याने आपला आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला आहे.

आज आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल. असा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. मात्र त्यानंतर देखील विद्यार्थ्यांचे आंदोलन कायम आहे. राज्यसभेच्या जागा वाढल्या पाहिजेत. या मागणीवर विद्यार्थी अद्यापही ठाम असून जोपर्यंत सर्वच्या सर्व मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे.

MPSC student Protest.
MPSC Student Protest: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; परीक्षा पुढे ढकलली

फक्त विषय हा परीक्षा पुढे ढकलून नोटिफिकेशन काढण्यात एवढाच आंदोलनाचा विषय नव्हता राज्यसभेच्या जागा वाढीचा देखील निर्णय राज्य सरकारने त्वरित घेणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबतची देखील मागणी आता विद्यार्थ्यांकडून जोर धरू लागले आहे.

MPSC कडून काढण्यात आलेल्या नोटिफिकेशन बाबत स्पष्टता आलेली नाही. कृषी सेवेचा 258 जागेबाबत अद्याप सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. ग्रुप 'बी' आणि 'सी' च्या 15 हजार जागांची वाढ व्हावी ही मागणी मान्य करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे.

MPSC student Protest.
Ravindra Dhangekar: आमदार रविंद्र धंगेकरांचे शिंदे सरकारला अल्टिमेटम; तोडगा काढा अन्यथा...

पोलिसांकडून विद्यार्थ्यांची संवाद साधून आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात येत आहे. मात्र आमच्या मागण्या देखील पूर्ण झालेल्या नाहीत त्यामुळे जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.