राष्ट्रवादीकडून बँकेवर बिनविरोध अन् आता पाटलांना साथ दिल्यानं भरणेंची प्रतिष्ठा पणाला

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे.
Appasaheb Jagdale, Dattatray Bharne, Harshvardhan Patil
Appasaheb Jagdale, Dattatray Bharne, Harshvardhan PatilSarkarnama

इंदापूर : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव करून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी तालुक्यातील आपली ताकद दाखवून दिली. पण आता पुन्हा एकदा त्यांची प्रतिष्ठा पणाला लागण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे (PDCC Bank Election) बिगूल वाजले असून ही निवडणूक चुरशीची होणार की गतवर्षीसारखी बिनविरोध होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

जिल्हा बँकेची गतवर्षीची पंचवार्षिक निवडणूक इंदापूर तालुक्यामध्ये बिनविरोध झाली होती. विविध कार्य़कारी सेवा संस्था गटातून विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे हे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामधून बिनविरोध निवडणूक आले होते. पण विधानसभा निवडणुकीवेळी जगदाळे यांनी भाजपकडून निवडणूक लढवलेले हर्षवर्धन पाटील यांना उघडपणे पाठिंबा दिला होता. यानंतर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

Appasaheb Jagdale, Dattatray Bharne, Harshvardhan Patil
दत्तात्रय भरणे निवडणुकीच्या मैदानात; हर्षवर्धन पाटील वाढवणार टेन्शन?

जगदाळे यांची जिल्हा बँकेसाठी उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी उमेदवार देणार की गतवर्षीप्रमाणे या गटातील निवडणूक बिनविरोध होणार, यावरून तालुक्यात चर्चांना जोर आला आहे. तालुक्यामध्ये या गटात 183 प्रतिनिधी निवडणूकीमध्ये मतदान करणार आहेत. पाटील व जगदाळे हे दोघे एकत्र आल्यानं यावेळी त्यांची ताकद वाढली आहे. त्याचा फायदा बँकेच्या निवडणूकीत होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे भरणे व जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासारखे नेते असतानाही तालुक्यातील कर्मयोगी सहकारी साखर कारखाना व नीरा भिमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. राष्ट्रवादीने आयत्यावेळी निवडणुकीतून माघार घेतली. आता बँकेच्या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे तालुक्यासह जिल्हाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत भरणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जगदाळे हे उमेदवार असतील तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी उमेदवार देणार की नाही, याबाबत लवकरच राष्ट्रवादीची रणनीती ठरणार आहे. याबाबत गारटकर यांच्याशी संपर्क केला असता पक्षामध्ये चर्चा करुन उमेदवार निश्‍चित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Appasaheb Jagdale, Dattatray Bharne, Harshvardhan Patil
सातशे शेतकऱ्यांच्या मृत्यूची नोंद नाही, मग लाखो कोरोना बळींचा आकडा कसा मिळवला?

दरम्यान, भरणे यांनी बुधवारी (ता. 1) ‘ ब ’ वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मागील 25 वर्षांपासून ते बँकेचे संचालक आहेत. बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने पून्हा एकदा बँकेवर जाण्याचा भरणे यांचा मार्ग सोपा असल्याचे मानले जात आहे. आता भरणे यांच्याविरोधात उमेदवार कोण असणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 21 संचालक पदांसाठी ही निवडणूक होणार आहे. ता. 2 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार असून 29 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. ही बँक म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. राज्यमंत्री भरणे मागील 25 वर्षापासून संचालक असून त्यांनी अध्यक्षपदाची धुराही सांभाळली आहे. भरणे हे मागील अनेक वर्षापासून ‘ब ’ वर्गातून निवडणूक लढवत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com