धनगर आरक्षणासाठी अनोखे आंदोलन : सर्वच राजकीय पक्षांची चिन्हे बांधली साखळदंडात!

राजकारणाचे जोडे बाजूला ठेवत धनगर ऐक्य परिषदेने अनोखे आंदोलन करत सर्वच राजकीय पक्षांची चिन्हे साखळदंडाने बांधत आरक्षणासाठी रणशिंग फुंकले आहे.
Dhangar community reservation
Dhangar community reservationSarkarnama
Published on
Updated on

इंदापूर (जि. पुणे) : धनगर (Dhangar) आरक्षणाचा (reservation) मुद्दा पुन्हा एकदा पेटला असून आंदोलनाची सुरुवात इंदापूरमधून (Indapur) झाली आहे. राजकारणाचे जोडे बाजूला ठेवत धनगर ऐक्य परिषदेने अनोखे आंदोलन करत सर्वच राजकीय पक्षांची चिन्हे साखळदंडाने बांधत आरक्षणासाठी रणशिंग फुंकले आहे. (Agitation in Indapur for Dhangar community reservation)

धनगर ऐक्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. शशिकांत तरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर येथे धनगर समाजाची बैठक पार पडली. त्यानंतर सभागृहासमोरच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या चिन्हांना साखळदंडाने बांधत आरक्षण मिळण्यासाठी घोषणा देत सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला.

Dhangar community reservation
सोलापूर राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे मुख्यमंत्री शिंदे गटाच्या मार्गावर

डॉ. शशिकांत तरंगे म्हणाले की, गेली ७० वर्षे सर्वच राजकीय पक्षांनी धनगर आरक्षणाचा (एसटीमध्ये समावेश) प्रश्न प्रलंबित ठेऊन समाजाला सुविधांपासून वंचित ठेवले आहे. धनगर समाजाची प्रलंबित असणारी ‘र’ आणि ‘ड’ शब्द दुरुस्ती करून धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील बारा जातींच्या हिंदी व इंग्रजी भाषेच्या उच्चारांचा, शब्दांच्या दुरूस्तीचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाने घेतला आहे.

Dhangar community reservation
बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला मोठा धक्का : जिल्हाध्यक्ष करणार शिंदे गटात प्रवेश

केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या या शब्द दुरुस्तीचा निर्णय मंत्रिमंडळाने तातडीने घ्यावा व समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा. अन्यथा धनगर समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात या पद्धतीने राजकीय पक्षांना साखळ दंडात बांधण्याचे आंदोलन धनगर ऐक्य परिषदेच्या वतीने करण्यात येईल, असा इशाराही तरंगे यांनी या वेळी दिला.

यावेळी महेंद्र रेडके, कुंडलिक कचरे, तुकाराम करे, विशाल मारकड, अमोल करे, विजय चोरमले, अमोल कोळेकर यांचेसह मोठ्या संख्येने धनगर तरुण आंदोलनात सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com