Manikrao Kokate : पहाटेचा शपथविधी आठवा, मीच पाठीमागे उभा होतो! मंत्री कोकाटेंचे विधान, दादांनी 'ती' चूक सुधारली...

Ajit Pawar Sharad Pawar in Baramati Krushik Exibition : बारामतीमध्ये आज कृषिक या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी माणिकराव कोकाटे उपस्थित होते.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थित आज बारामतीत कृषिक या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना कोकाटे यांनी आपण गरज असेल तर सकाळी किती लवकर उठू शकतो, हे पटवून देण्यासाठी पहाटेच्या शपथविधीची आठवण काढली. यावेळी उपस्थितांमध्ये खसखस पिकली होती.

प्रदर्शनाच्या उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आदी उपस्थित होते. कोकाटे यांच्या भाषणापूर्वी पंकजा मुंडे यांनीही सकाळी लवकर उठण्यावरून भाष्य केले होते. तोच धागा पकडत कोकाटे यांना पहाटेचा शपथविधी आठवला.

Manikrao Kokate
Pankaja Munde in Baramati : पवारांच्या कार्यक्रमाची पंकजा मुंडेंना भुरळ; म्हणाल्या, मला दर महिन्याला बोलवत जा!

कोकाटे म्हणाले, एवढ्या सकाळी उठून कामाला लागण्याचा पहिलाच दिवस माझ्या आयुष्यात मी बघतोय. दादांना माहित आहे, मी उशिरा उठतो. त्यामुळे दादांनी मला रात्रीच सांगितलं, उद्याचा दिवस तसदी घ्यावी लागले. मी म्हटलं, गरज असते तेव्हा मी खांद्याला खांदा लावून कुठेही उभा असतो. पहाटेचा शपथविधी आठवा. मीच पाठीमागे उभा होतो.

कोकाटे यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. तर अजित पवारांनीही पहाट नव्हती ती, आठ वाजले होते, अशी मिश्कील टिप्पणी केली. त्यानंतर अजिदादांसह उपस्थितांनाही हसू आवरले नाही. दादांच्या टिप्पणीनंतर कोकाटेंनी लोकं म्हणतात त्याप्रमाणे, असे म्हणत सावरून घेतलं. जे लोकांना आवडतं ते आम्हाला आवडतं. वेळ असली आणि काम असलं की सकाळी लवकर उठणे ही काळाची गरज आहे, असे पुढे कोकाटे म्हणाले.

Manikrao Kokate
Supriya Sule : धनंजय मुंडे परळीत अन्‌ सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, माझ्या जीवनातील सकाळ कधीच एवढी योग्य कामासाठी केली नाही. तीन-चार कप चहा पिण्यात गेली. डोकं खराब करणाऱ्या बातम्या ऐकण्यात गेली. आधी अजितदादांनी त्यांनी मला सकाळी 7.45 ला भेटण्यास सांगितले. मला यायला 7.31 झाले. पण दादा आधीच गाडीत बसले होते. मी धावत जाऊन गाडीत बसले. बारामतीत मला जरा दर महिन्याला बोलवत जा. इथला प्रोफेशनलिझम मला शिकता येईल, असे मुंडे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com