पुण्यात भाजपला दे धक्का ; नगरसेविका शितल सावंत यांच्या पतीचा राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपचे वीस ते पंचवीस नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या सुत्रांनी सांगितले.
Ajay Sawant,  Ajit Pawar
Ajay Sawant, Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

पुणे : येत्या काही दिवसात पुणे महानगरपालिकेची निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर पक्षबदल करण्यास सुरवात झाली आहे. पुणे राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काही दिवसांपूर्वी दावा केला होता की भाजपचे काही नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. त्यांच्या या विधानावर आज शिक्कामोर्तब झाले.

पुणे महापालिकेतील भाजपच्या विद्यमान नगरसेविका शीतल सावंत यांचे पती अजय सावंत (Ajay Sawant) यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत अजय सावंत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Ajay Sawant,  Ajit Pawar
राहुल गांधींच्या भाषणानं सत्ताधाऱ्यांच्या डोक्याला शॉट ; राऊतांनी डिवचलं

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंत यांचा राष्ट्रवादी प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. भाजपचे वीस ते पंचवीस नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या सुत्रांनी सांगितले. अजित पवार यांची आज कोरोना आढावा बैठक पुण्यात होती. या बैठकीनंतर सावंत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

आढावा बैठकीत अजित पवार यांनी शाळांबाबत महत्वाचा निर्णय घेतला. पुण्यातील प्राथमिक आणि माध्यमिकचे वर्ग पुर्णवेळ सुरु करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. राज्य सरकारने 1 फेब्रुवारीपासून शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पुण्यातील कोरोना संसर्गाची स्थिती पाहता पहिली ते आठवीचे वर्ग हे चार तासच भरवले जात होते. पण आता पहिली ते आठवीचे वर्गही पूर्णवेळ भरवण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Ajay Sawant,  Ajit Pawar
कॉग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून बड्या नेत्याचे नाव गायब

जिल्ह्यात लसीकरणालाही वेग आला असून, अनेकांचा पहिला डोस झाला आहे. तर पुणे जिल्ह्यातील दुसऱ्या डोसचे प्रमाणही 86 टक्के इतके झाले आहे. पण पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचे प्रमाणही कमी झालं आहे. ग्रामीण भागात चांगले लसीकरण झाले आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीचा तुटवडा आहे. पण येत्या सोमवारी लसींचा साठा उपलब्ध होईल. मी सुद्धा मुंबईत गेल्यावर संबंधितांशी बोलतो. राज्यात कुठेही लसींचा तुटवडा पडू नये यासाठी लवकरात लवकर निर्णय घेऊ, असेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com