अजित गव्हाणेंच्या हाती सूत्रे येताच राष्ट्रवादीचे नेते प्रथमच एकटवले : ‘शंभर प्लस’चा दिला नारा!

शहराध्यक्ष, महिला शहराध्यक्षांच्या जोडीला शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघनिहाय कार्याध्यक्ष प्रथमच देण्यात आले आहेत.
Pimpri-Chinchwad NCP
Pimpri-Chinchwad NCPSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (ncp) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी भोसरीतील नगरसेवक अजित गव्हाणे यांची शनिवारी (ता. १२ फेब्रुवारी) पक्षाने निवड केली. त्यानंतर घेण्यात आलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत ज्येष्ठ, कनिष्ठ असे शहरातील सर्व पक्ष पदाधिकारी गेल्या पाच वर्षांत प्रथमच झाडून एकवटल्याचे दिसून आले. यावेळी आगामी पालिका निवडणुकीत पक्षाचे शंभर प्लस नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार नवनियुक्त अध्यक्षांनी बोलून दाखवला. याअगोदर भाजपनेही (bjp) शंभर प्लसचा नारा दिला आहे. (Ajit Gawhane became city president of Pimpri-Chinchwad, all NCP leaders came together first time)

महापालिकेची सत्ता २०१७ मधील निवडणुकीत गेल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये नेतेनिहाय तसेच पिंपरी, चिंचवड, भोसरी अशी विधानसभा मतदारसंघानुसार गटबाजी राष्ट्रवादीत उफाळून आली होती. ती वारंवार दिसूनही आली होती. नवीन खांदेपालटात ती पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शहराध्यक्ष, महिला शहराध्यक्षांच्या जोडीला शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघनिहाय कार्याध्यक्ष प्रथमच देण्यात आले आहेत. हाच पायंडा युवक अध्यक्षांच्या बाबतीतही गिरवण्यात आला आहे. त्यामुळे पक्षातील नाराजी कमी होण्यास मदत झाली आहे. तरुणांना संधी देताना ज्येष्ठांनाही डावलण्यात आलेले नाही, त्यामुळे जुने नेतेही नाराज झालेले नाहीत. जुन्या, नव्या तसेच सर्व गटांना समावून घेण्यात आल्याने कधी नव्हे तो पक्ष शहरात पहिल्यांदा एकजूट झाल्याचा दिसला. ती पुढेही दिसेल, असा विश्वास नव्या शहराध्यक्षांनीही व्यक्त केला.

Pimpri-Chinchwad NCP
गव्हाणेंच्या नियुक्तीतून राष्ट्रवादीने केली आमदार लांडगेंची 'नाकाबंदी'

गेल्या पाच वर्षात भाजपने एकाही आश्वासनाची पूर्तता केली नसल्याचा हल्लाबोल नवे शहराध्यक्ष गव्हाणे यांनी केला. शहर विकासाचा मुद्दा आणि भाजपचा गेल्या पाच वर्षांतील प्रचंड भ्रष्टाचार हे मुद्दे लावून धरणार आहे. पुन्हा सत्तारुढ होण्यासाठी एकजिवाने व ताकदीने लढणार आहे. पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून शहरात पुन्हा पक्षाची सत्ता आणणार असून त्याचे नियोजनसुद्धा सुरु केल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.

Pimpri-Chinchwad NCP
राष्ट्रवादीच्या मैत्रीपूर्ण लढतीत आमदार राहुल कुल यांच्या हाती सत्तेची चावी!

या वेळी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी प्रत्येक गोष्टीचे श्रेय मोदी, शहांना देणाऱ्या भाजपवर उपरोधिक निशाणा साधला. शहराचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांना मोदी, शहांनी मोठे केलं. एवढंच ऐकायचं आता बाकी राहिलंय, अशी कोपरखळी त्यांनी भाजपला मारताच उपस्थित पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला. पिंपरी पालिका सभागृहातील सर्वात ज्येष्ठ नगरसेवक असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर योगेश बहल यांनी ‘आगे,आगे देखो, होता है, क्या’ असा सूचक इशारा शहर भाजपला दिला. पदउतार झालेल्या पदाधिकाऱ्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना साथ देणार असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com