राष्ट्रवादीच्या मैत्रीपूर्ण लढतीत आमदार राहुल कुल यांच्या हाती सत्तेची चावी!

भाजपचे आमदार राहुल कुल यांचा सुभाषअण्णा कुल दूध संघ असल्याने ते या निवडणुकीपासून अलिप्त राहणार असल्याचे मानले जात आहे.
Popatrao-Takavane
Popatrao-TakavaneSarkarnama
Published on
Updated on

केडगाव (जि. पुणे) : पुणे जिल्हा सहकारी दूध संघाची (कात्रज) निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. इच्छुकांनी अगोदरपासूनच मोर्चेबांधणी करायला सुरूवात केलेली आहे. दौंड तालुक्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच मैत्रीपूर्ण लढत होण्याची चिन्हे आहेत. भाजपचे आमदार राहुल कुल (Rahul kul) यांचा सुभाषअण्णा कुल दूध संघ असल्याने ते या निवडणुकीपासून अलिप्त राहणार असल्याचे मानले जात आहे. असे असले तरी कुल यांच्याकडे १० ते १२ मतदान आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मैत्रीपूर्ण लढतीत राहुल कुल कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकतात, त्यांचा विजय होण्यास मदत होणार आहे. (Election of Pune jillha Dudh sangh : Friendly fight between NCP in Daund)

दूध संघाच्या निवडणुकीत दौंड तालुक्यात ८० मतदान आहे. मागील निवडणुकीत ५७ मतदान होते. सरकारच्या निर्णयामुळे अक्रियाशील दूध संस्थांना यंदा मतदान करण्याचा अधिकार दिला गेल्यामुळे ही संख्या वाढली आहे. राष्ट्रवादीकडून दौंड तालुक्यात पोपटराव ताकवणे, सागर फडके, राहुल दिवेकर हे तीव्र इच्छुक आहेत. सागर फडके यांचे वडील नानासाहेब फडके व राहुल दिवेकर यांचे वडील रामदास दिवेकर (विद्यमान संचालक) या दोघांनीही दूध संघावर संचालक म्हणून काम केले आहे. ताकवणे, फडके, दिवेकर या तिघांनीही मोठी मोर्चेबांधणी खूप आधीपासून केली आहे. भाजपकडे १० ते १२ मतदान असल्याने इच्छुक उमेदवार भाजप मतदारांच्या संपर्कात आहेत. कुल दूध संघाकडे असलेल्या दूध संस्था पुणे जिल्हा दूध संघाशी संलग्न नाहीत.

Popatrao-Takavane
गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी हात जोडून केली ही विनंती...

पोपटराव ताकवणे हे २००९ मध्ये काँग्रेसकडून, तर नानासाहेब फडके राष्ट्रवादीकडून लढले होते. त्या निवडणुकीत फडके यांचा विजय झाला होता. आता ताकवणे राष्ट्रवादीत आहेत. ताकवणे अध्यक्ष असलेली रेणुका दूध संस्था जिल्ह्यात नावाजलेली आहे. ताकवणे यांचा अनुभव व वय विचारात घेता त्यांना राष्ट्रवादीने संधी द्यावी, असे कार्यकर्त्यांचे मत आहे.

Popatrao-Takavane
आमदार संजय शिंदे-प्रशांत परिचारकांच्या मैत्रीची दूध पंढरीच्या आखाड्यातून नवी सुरुवात!

भाजप हा २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीतही उतरला नव्हता. त्या निवडणुकीत रामदास दिवेकर आणि नानासाहेब फडके यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली होती. त्यामध्ये दिवेकर यांचा विजय झाला होता. जिल्ह्याच्या आरक्षित जागेवर रामभाऊ टुले यांचा शिरूरच्या जीवन तांबे यांनी पराभव केला होता. इतर आरक्षित जागांसाठी संघाचे माजी अध्यक्ष रामभाऊ टुले, प्रकाश भागवत, रामदास डेंबळकर आदी इच्छुक आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com