पुण्यातल्या पावसावरून दोन दादांमध्ये जुंपली...

PMC : काल रात्री झालेल्या मुसळधारमुळे पुण्याची दैना झाली...
Ajit Pawar & Chandrakant Latest News
Ajit Pawar & Chandrakant Latest NewsSarkarnama

मुंबई : पावसाने थैमान घातल्याने पुणेकर पाण्यात अडकले असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमुळे मुंबईत आरोप-प्रत्यारोपांच्या धारा कोसळत राहिल्या. पुण्यातील एकमेकांचा कारभार जबाबदार असल्याचे सांगत आजी-माजी कारभाऱ्यांनी अर्थात, पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी परस्परांच्या सत्ताकाळ उघडा पाडला. (Ajit Pawar & Chandrakant Latest News)

Ajit Pawar & Chandrakant Latest News
दाऊद, हाफीजवरील प्रश्नावर पाकिस्तानवर आली तोंड लपविण्याची वेळ!

दरम्यान, उणीदुणी काढण्यातून पुण्यातील धोकादायक स्थितीची चौकशी करण्यापलीकडे काही साध्य झाले नसल्याचे दिसून आले आहे. परतीच्या पावसामुळे सोमवारी (ता.१७ ऑक्टोबर) रात्री धुमाकूळ घातल्याने पुण्यातील रस्ते, वस्त्या आणि सोसायट्यांत पाणी शिरून नागरिकांचे प्रचंड हाल झाले. त्यावरून पुणे महापालिकेतील नव्या-जुन्या म्हणजे, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांच्या कारभाराला दोष दिले. या राजकीय वादाचे पडसाद राज्याच्या वर्तुळातही उमटले दिसले.

Ajit Pawar & Chandrakant Latest News
सोन्यासारखा माल पण कमीमध्ये चाललायं.. भुजबळांनी भाव वाढवत लिलाव गाजवला...

स्मार्टसिटीचे स्वप्न दाखवून भाजपने पुणे शहराचे वाटोळे केल्याचा घणाघात पवार यांनी भाजप नेत्यांवर केला. तर अडीच वर्ष पुण्याचे पालकमंत्रीपद असूनही काहीच केलं नसल्याचा आरोप करत पाटील यांनी पवारांवर पटलवार केला.

दरम्यान, काल रात्री झालेल्या मुसळधारमुळे पुण्याची दैना झाली आहे. यामुळे पुण्यातील स्मार्टसिटीचे वास्तव चित्र पुणेकरांना पुन्हा एकदा नव्याने बघायला मिळाले. यामुळे राजकीय मंडळी निव्वळ राजकीय आरोप-प्रत्यारोपातच गुतंलेल्याचं चित्र दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com