Ajit Pawar News : सारखंच कर्ज माफ कसं व्हायचं? बँका अडचणीत येतात; अजितदादांनी शेतकऱ्यांना फटकारलं

Ajit Pawar Farmers Loan Waiver : अजित पवार म्हणाले की, कर्जमाफीचा निर्णय जूनला होईल मात्र त्याची माहिती आम्ही एप्रिलमध्येच देऊ.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : "कर्जमाफीसंदर्भात आंदोलकांशी चर्चा झाली असून, ३० जूनला कर्जमाफीचा निर्णय होईल. एप्रिलमध्ये माहिती देऊ. मात्र, शून्य टक्के व्याजाने कर्ज दिल्यावर वेळेत परतफेडीची सवय लावा. बँका अडचणीत येतात. सारखंच कर्ज माफ कसं व्हायचं? यापूर्वी शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी दिली. आता पुन्हा लोकं म्हणतात, 'तुम्ही सांगितलंय माफ करा.' पण, कर्जमाफीला हजारो कोटी लागतात," अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा ६४व्या गळीत हंगाम प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ३१) झाला. याप्रसंगी झालेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे होते. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, माजी अध्यक्ष संभाजी होळकर आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, "पुरंदरला काही हजार एकरात विमानतळ होत आहे. मलाही वाटत नाही की शेतकऱ्यांच्या जमिनी जाव्यात. बारामतीतही काही शेतकऱ्यांच्या रेल्वेसाठी जमिनी जात आहेत. विकासासाठी काही तडजोड करावी लागते. त्यामुळे पुरंदरचे नागरीकरण होईल. सोमेश्वर

कारखान्यावर रस्ता रुंदीकरणासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यासाठी दुकाने हलवावी लागणार आहेत. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मोरगावकरांनीही मयुरेश्वराच्या नियोजनबद्ध विकासासाठी जागा दिली तर शंभर कोटी रुपये आणू."

Ajit Pawar
Jaykumar Gore News : महिला डॉक्टरच्या मोबाईलमधील माहिती बाहेर काढायला लावू नका, मृत्युनंतर बदनामी करण्याची संस्कृती नाही; मंत्री गोरे चाकणकरांच्या एक पाऊल पुढे

युनियनच्या नावाखाली सह्या करून चकाट्या पिटणाऱ्या कामगारांबाबत, ऊस उत्पादक 'एआय' शेतीकडे वळत नसल्याबद्दल, तसेच सोमेश्वर मंदिरातील गाळ्यांना भेगा पडल्याबद्दल अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. तर निंबूतमध्ये स्ट्रॉबेरीचे पीक घेतल्याबद्दल दीपक जगताप या शेतकऱ्याचे कौतुक केले.

लोकं शिकल्यावर देवदर्शन कमी होईल असे वाटले होते, पण शिकली सवरलेले लोक जास्त देवदेव करतात. आम्ही पण जातो, पण अमक्या गावात गेले की पद जाते, असे सांगतात. असे काही नसतं. पंचवीस वर्षे मी पदावर आहेच की, अशी मिस्किल टिपणीही यावेळी अजित पवार यांनी केली.

'एकरकमी एफआरपी अडचणीची'

कारखान्यांचा तोडणी वाहतूक खर्च, व्याज, पगार, केमिकल आदी खर्च १,५०० रुपये प्रतिटनांवर गेले आहे. आपण एफआरपी देण्यासाठी जेवढी जास्त उचल घेऊ तेवढे जास्त व्याज जाणार आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट करत एकरकमी एफआरपी अडचणीची असल्याचे अप्रत्यक्ष सुचविले.

Ajit Pawar
Farmers Loan Waiver : 'शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्यच नाही...अरे-तुरेची भाषा'; बच्चू कडू-देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत काय घडलं? मोठ्या नेत्याने सांगितली इनसाईड स्टोरी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com