Ajit Pawar : मुलींवरील अत्याचार प्रकरणानंतर अजितदादा 'अ‍ॅक्शन मोडवर', बारामतीसाठी 'शक्ती अभियान'

Ajit Pawar announces Shakti Abhiyan : मुली, महिलांना पाठलाग करत त्रास देण्यात येत असेल. छेडछाड होत असेल तर त्यांनी निर्भयपणे आपली तक्रार मांडण्यासाठी 'शक्ती बाॅक्स' (तक्रार पेटी) बसण्यात येणार आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : बारामतीमधील दोन मुलींवर अत्याचाराची घटना उघडकीस आली होती. या घटनेच्या तपासात मुलींवर 12 ते 14 मुलींनी अत्याचार केल्याचे समोर आले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज (गुरुवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती पोलिसांच्या सोबत सकाळी बैठक घेत महिला, मुलींच्या सुरक्षेसाठी 'शक्ती अभियान' सुरू केले आहे.

मुली महिलांना पाठलाग करत त्रास देण्यात येत असेल. छेडछाड होत असेल तर त्यांना निर्भयपणे आपली तक्रार मांडण्यासाठी 'शक्ती बाॅक्स' (तक्रार पेटी) बसण्यात येणार आहे. हे शक्ती बाॅक्स दोन दिवसांत उघडले जाणार असून तक्रारींची दखल दखल घेत त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

मुली, महिलांना तक्रार करता यावी यासाठी तक्रार पेटी शाळा, काॅलेज, सरकारी कार्यालय, ट्यूशन, एसटी स्टँड, खासगी कंपन्या, महिला वस्तीगृह, पोस्ट ऑफीस येथे 'शक्ती बाॅक्स' लावण्यात येणार आहे. तक्रार करणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
Mahayuti Politics Video: भाजपची माघार नाहीच, एकनाथ शिंदेंना फक्त 70 जागा?

मुलींना तक्रार करण्यात यावी यासाठी 'एक काॅल प्रोब्लेम साॅल' या अंतर्गत हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या नंबरवर मुली, महिला आपली तक्रार नोंदवू शकतात. तसेच काही चुकीचे घडत असेल तर त्याचा फोटो, व्हिडिओ काढून त्यावर पाठवू शकतात. त्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे देखील अजित पवार यांनी सांगितले.

पोलिस ठाण्यात महिला, मुली यांना निर्भयपणे त्यांची तक्रार मांडता यासाठी 'शक्ती कक्ष' स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षात दोन महिला पोलिस असणार असून तक्रार भयभीत न होता मांडताय याव्यात यासाठी या कक्षात पोषक वातावरण निर्माण केले जाणार आहे.

शाळा काॅलेजला भेट देत महिला मुलींच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. शाळा काॅलेजसोबत सरकारी कार्यालय, महिला वस्तीगृह, एसटी स्टँड येथे भेट देत. गुडटच बॅड टच विषयी जागृती तसेच सुसंवाद साधून लैंगिक, मानसिक शोषण रोखण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे.

Ajit Pawar
Election : राज्यात निवडणुकांचा डबल धमाका, 29 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मुहुर्त ठरला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com