Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवारांसमोर जाताच अजितदादांनी आपली वाट बदलली; मोदींच्या व्यासपीठावर नेमकं काय झालं ?

Narendra Modi Visit Pune : मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली पवारांची भेट
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही व्यासपीठावर होते. यावेळी शिंदे आणि फडणवीस यांनी पवारांची भेट घेतली, मात्र अजित पवारांनी त्यांच्या पुढेही जाणे टाळल्याचे दिसून आले. यानंतर अजितदादांनी आपली वाट बदलली का, असा प्रश्न उपस्थित करीत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Latest Political News)

पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमासाठी शरद पवार १५ मिनिटे आगोदर पोहचले होते. तेथे ते एकटेच असताना माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आले. यानंतर मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार आले. व्यावसपीठावर येताच शिंदे-फडणवीस थेट पवारांकडे गेले. त्यांच्या नमस्कार करत आपल्या खुर्चीकडे वळले. दरम्यान, शिंदे-फडणवीस पवारांशी बोलत असताना अजित पवार मात्र शरद पवारांच्या मागच्या बाजूने गुपचूप आपल्या खुर्चीकडे गेले आणि स्थानापन्न झाले. पवारांना समोर पाहताच ते थोडेसे गडबडल्याचेही दिसून आले.

Sharad Pawar, Ajit Pawar
PM Narendra Modi News: आम्ही एखाद्या रस्त्याचे नाव बदलले तरी काहींना पोटशूळ उठतो; मोदींची विरोधकांवर टीका

बंड केल्यानंतर अजित पवारांनी भाजप दिल्लीतून पाठबळ दिले. खाते वाटप होताच अजित पवार गटाने दोनदा पवारांची भेट घेऊन मनपरीवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पवारांनी मात्र आपण भाजपविरोधात असल्याची भूमिका कायम असल्याची स्पष्ट केले. यानंतर आज दोघेही मोदींच्या सन्मानार्थ कार्यक्रमात प्रथमच एकत्र आले होते. यावेळी अजितदादांनी शरद पवार यांच्या पुढे न जाता आपली वाटच बदलून त्यांना टाळल्याचे दिसून आले. फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस आज ना उद्या एकत्र येईल, अशी चर्चा असताना आज पवारांना बगल दिल्याने अजित पवारांनी खरेच आपली वाट बदलली का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Mhaswad Bandh News: भिडे यांच्या निषेधार्थ म्हसवडला बंद; सर्वपक्षीयांचा 'रास्ता रोको'
Narendra Modi in Pune
Narendra Modi in Pune Sarkarnama

दरम्यान, पंतप्रधान मोदींना टिळक पुरस्कार घोषित करताच काँग्रेसने विरोध करण्यास सुरूवात केली होती. तसेच ठाकरे गट आणि काँग्रेसकडूनही शरद पवारांनी या कार्यक्रमाला जाऊ नये, असे आवाहन केले होते. यामुळे विरोधकांबाबत जनतेच्या मनात संभ्रमाचे वातावरण होण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. यानंतर मणिपूर पेटत असताना पुण्यात आलेल्या मोदींना महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानेही काळे झेंडे दाखवून निषेध केला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बंडानंतर प्रथमच एकत्र येणाऱ्या अजित पवार आणि शरद पवारांकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com