Ajit Pawar News : अजित पवारांचे ठरले; काही झाले तरीही महायुतीतच राहणार

Ncp Politics News : बारामतीकडे बघत इतर तालुके, पुणे, महाराष्ट्र फिरायचा आहे. येथील लोकांनी जबाबदारी पाळायची असून येत्या काळात महायुतीचा प्रचार करा, असे स्पष्ट शब्दांत अजित पवार यांनी सांगत सुरु असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramti News : बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची रविवारी जन सन्मान रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीमध्ये बोलताना अजित पवार यांनी काहीही झाले तरी येत्या काळात महायुतीसोबत राहण्याचे संकेत दिले. आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाचा धक्का बसला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकमेव खासदार या निवडणुकीत विजयी झाला. त्यामुळे काहीशी नाराजी होती. त्यामुळे अजित पवार हे महायुती सोडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील, अशी चर्चा जोरात सुरु होती. मात्र, हे सर्व मुद्दे खोडून काढत महायुतीबाहेर पडण्याच्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला.

भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत. विकासाचे ध्येय ठेवून पुढे जायचे आहे. मला बारामतीकडे बघत इतर तालुके, पुणे, महाराष्ट्र फिरायचा आहे. येथील लोकांनी जबाबदारी पाळायची असून येत्या काळात महायुतीचा प्रचार करा, असे स्पष्ट शब्दांत अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगत सुरु असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

आम्ही खोटे बोलणार नाही. आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही. सत्ता येत असते, जात असते. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेला नाही. सत्तेचा वापर गरिबांसाठी झाला पाहिजे, या मतांचे आपण आहोत, असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

शनिवारी सकाळीच अजित पवार हे दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री प्रफुल्ल पटेल हे देखील होते. यावेळी शहा यांच्यासोबत एमएसपी संदर्भात चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच राज्यातील विविध प्रश्नांवर सविस्तरपणे चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

अमित शाह यांची भेट घेत साखरेच्या संदर्भात त्यांच्याशी बोलणी केली. एमएसपी वाढवायला पाहिजे, असे त्यांना सांगितले. त्या संदर्भातील निवेदन त्यांना उद्या देणार असल्याचे अजित पवार म्हणाले. 21 जुलैला ते पुणे दौऱ्यावर येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar
Congress News : काँग्रेस न्यायालयात जाण्याच्या तयारीत; कर्ज नको, 'लाडकी बहीण योजना' बरखास्त करा !

त्यासोबतच शनिवारी मुंबईतील कार्यक्रमावेळी पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्याच्या विकासासाठी विविध योजनांची घोषणा त्यांनी केली आहे. त्यासोबतच जगाची आर्थिक राजधानी मुंबईला करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे येत्या काळात महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे येत्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही झाले तरी महायुतीसोबतच राहतील, अशी चर्चा कार्यक्रमानंतर नागरिकांतून ऐकावयास मिळत होती.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या वर्षभरापूर्वीच्या फोडाफोडीनंतर पक्ष चिन्हासह मिळवल्यानंतर अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीला समोरे गेले. त्यामध्ये चार जागा लढवल्या. त्यामधील एक जागा जिंकली.

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांना फटका बसणार असा अंदाज वर्तवला जात असताना त्यांनी दोन जागा खेचून आणल्या. त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला असून त्यामुळे त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने चार्ज केले. येत्या काळात अजितदादा आणि त्यांच्या टिमसाठी विधानसभा निवडणूक ही अग्निपरीक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी बारामतीतून निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले.

Ajit Pawar
Sakal Survey 2024 : महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला सर्वाधिक लाभ; बदललेल्या समीकरणांचा झाला फायदा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com