Congress News : काँग्रेस न्यायालयात जाण्याच्या तयारीत; कर्ज नको, 'लाडकी बहीण योजना' बरखास्त करा !

Political News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 'लाडकी बहीण योजना' हा एक 'चुनावी जुमला 'आहे. त्यामुळे ही योजना बरखास्त करून राज्याच्या पायाभूत सुविधांवर लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा या योजनेविरोधात न्यायालयात जाणार असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
Congress News
Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : देशातील सर्वोच्च घटनात्मक यंत्रणा असलेल्या 'कॅग'च्या अहवालामुळे राज्य सरकार हे महाराष्ट्रातील जनतेला अर्थ संकल्पाच्या माध्यमातून फसवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्ज काढून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविणे राज्याच्या हिताचे नाही. शिवाय ही योजनाच फसवी आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एक 'चुनावी जुमला 'आहे. त्यामुळे तातडीने ही योजना बरखास्त करून राज्याच्या पायाभूत सुविधांवर लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा या योजनेविरोधात न्यायालयात जाणार असा इशारा काँग्रेसने (Congress) दिला आहे. (Congress News)

याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आबा बागुल (Aba Bagul) म्हणाले, देशाचे नियंत्रक व महालेखापरीक्षकांनी राज्य सरकारने अनावश्यक अनुदाने कमी करावीत, असे निरीक्षण नोंदविले आहे. त्याशिवाय राज्य सरकार बेदरकार पद्धतीने उधळपट्टी करत असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो किंवा युवा प्रशिक्षण, रोजगार मेळावे यावर राज्याच्या तिजोरीतून भरमसाठ पैसा खर्च करणे हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही.

एकीकडे राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे अजूनही सक्षम नाही तसेच जी काही कामे होत आहेत, त्यात गुणवत्ता नाही. त्यामुळे विकासकामे चांगल्या दर्जाची कशी होतील आणि मूलभूत सुविधा जनतेला जास्तीस जास्त कशा उपलब्ध होतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Congress News
Raosaheb Danve : दिल तो बच्चा है जी..! पराभवानंतरही रावसाहेब दानवेंनी शब्द पाळला...

राज्यात सार्वजनिक आरोग्य सुविधा तोकडी पडत आहे हे वास्तव आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अवाजवी आणि फसव्या योजना राबविणे म्हणजे महाराष्ट्रातील जनतेची शुद्ध फसवणूक आहे. त्यातही लाडकी बहीण योजनेसाठी कर्ज काढण्याची भूमिका राज्य सरकारची असेल तर त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा देताना आबा बागुल यांनी ही योजनाच तातडीने बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

Congress News
Sakal Survey 2024: दोन्ही राष्ट्रवादीसाठी विधानसभा निवडणूक अस्तित्वाची लढाई; पुन्हा आमने-सामने...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com