Ajit Pawar news : बीड सरपंच हत्याप्रकरणी अजितदादांचा थेट इशारा; म्हणाले, 'आम्ही तिघांनी लक्ष दिलंय त्यामुळं...'

Political News : बारामतीमध्ये बोलताना आम्ही तिघांनी लक्ष घातलेय, त्यामुळे आता या प्रकरणातून कोणीही सुटणार नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री पवार यांनी थेट इशारा दिला.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची ९ डिसेंबरला हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणामुळे राज्यभरातील वातावरण तापले आहे. या हत्या प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधकांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन सादर करीत या प्रकरणाची एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे शनिवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या प्रकरणातील मास्टरमांइड कोणीही असेल तो सुटणार नाही, असा इशारा दिला होता. त्यानंतर रविवारी बारामतीमध्ये बोलताना आम्ही तिघांनी लक्ष घातलेय त्यामुळे आता या प्रकरणातून कोणीही सुटणार नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री पवार यांनी थेट इशारा दिला आहे. (Ajit Pawar news)

बारामती राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) तालुका व शहरच्या वतीने शारदा प्रांगण येथे सलग सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल अजित पवार यांचा रविवारी नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा बारामतीमध्ये बोलताना बीड हत्या प्रकरणी इशारा दिला आहे. पोलीस यंत्रणेला देखील आदेश दिले असून, या प्रकरणाचा सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या.

Ajit Pawar
Mahayuti Cabinet : महायुतीच्या मंत्रिमंडळात ‘या’ तीन मातब्बर नेत्याचे डिमोशन; कोणते कारण भोवले?

बीड जिल्ह्यामध्ये घडलेली घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे. त्या घटनेचा मास्टरमाइंड कुणी असला तरी त्याची कितीही पोहच असली तरी आम्ही त्याला सोडणार नाही. बीडच्या घटनेत आम्ही तिघांनी लक्ष घातले आहे. या प्रकरणात फास्ट ट्रॅक केस चालवून फाशीची शिक्षा होईल, अशी सजा त्यांना मिळेल, असे अजित पवार (Ajit pawar) म्हणाले.

Ajit Pawar
Mahayuti Cabinet : महायुतीच्या मंत्रिमंडळात ‘या’ तीन मातब्बर नेत्याचे डिमोशन; कोणते कारण भोवले?

त्यासोबतच परभणीमध्ये घडलेल्या घटनेत देखील आम्ही लक्ष घातले आहे. पोलीस यंत्रणेला देखील या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, या प्रकरणाचा सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बारामतीत देखील अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडत असतात, त्यामुळे आई-वडिलांनी मुलांकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
Mahayuti News : मंत्र्यांच्या स्टाफ नेमणुकीवर मुख्यमंत्र्यांचा वॉच; 'या' अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला लागणार ब्रेक

ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधकांना टोला

विरोधकांकडून विधानसभा निकालानंतर सातत्याने ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे, यावर बोलताना अजित पवार म्हणाले, जनता एकतर्फी कौल देईल, असे आम्हाला वाटले नव्हते. आम्ही कधीही ईव्हीएमला दोष दिला नाही. लोकसभानंतर महायुती अधिक जोमाने कामाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना आणि शेतकरी वर्गासाठी केलेल्या वीज माफीमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले, असे अजित पवार यांनी स्पष्ट करीत त्यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधकांना टोला लागावला.

Ajit Pawar
Shivsena News: शिवसेना नेत्याने सांगितली आतली माहिती; 'मंत्र्यांची दर तीन महिन्यांनी होणार...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com