Ajit Pawar Visit Hinjawadi : अजित पवार पहाटे हिंजवडी आयटी पार्कमध्ये पोहोचले, सरपंचाला झापलं; म्हणाले,'आपलं वाटोळं झालं...'

Ajit Pawar Hinjawadi It Park : अजित पवारांनी मेट्रोच्या कामांची आणि हिंजवडीतील इतर समस्यांची पाहणी केली. रस्ते वाहतूक कोंडी आणि इतर नागरी समस्यांबाबत ते आक्रमक झाले होते.
jit Pawar seen interacting with locals during his unexpected early morning visit to Hinjawadi.
jit Pawar seen interacting with locals during his unexpected early morning visit to Hinjawadi.sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : हिंजवाडी पार्कच्या समस्याने आयटीयन्स त्रस्त आहेत. वाहतूक कोंडी नेहमीचीच झाली आहे. त्यात पावसाळ्यात आयटी पार्कमधील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे दोन आठवड्यांपूर्वी अजित पवारांनी पाहणी करत विकासकामांच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होता.

आज (शनिवारी) पहाटे सहा वाजता अजित पवार हिंजवडीमध्ये पोहोचले.अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनेनुसार काम सुरू झाले आहे का? याची पाहणी ते करत होते. विकासकामांमध्ये अडथळे येत असतील सरकारी कामांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, असा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

कामात मंदिर जात असल्याबाबतची समस्या हिंजवडीचे सरपंच मांडत असतानाच अजित पवारांनी त्यांना झापले. म्हणाले, 'धरण बांधताना मंदिरत जातातच ना. आपलं वाटोळं झालं. आपली हिंजवडीची आयटी पार्क माझ्या पुण्याच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर बंगळुरू, हैद्राबादला चाललंय. तुम्हाला काही पडलं नाहीये. मी का सकाळी सहा वाजता इथे येऊन बघतोय त्याच्यामुळेच बघतोयना.'

अजित पवारांनी मेट्रोच्या कामांची आणि हिंजवडीतील इतर समस्यांची पाहणी केली. रस्ते वाहतूक कोंडी आणि इतर नागरी समस्यांबाबत ते आक्रमक झाले होते. अधिकाऱ्यांना सूचना करत म्हणाले, 'कोणीही विकास कामाच्या आड आलं तर त्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करा. कुणी आडवा आला तर संपूर्ण कामच करून टाकायचं. जर कोणी मध्ये आला तर 353 दाखल करायचा अजित पवार जरी आला तरी 353 दाखल करायचं.'

jit Pawar seen interacting with locals during his unexpected early morning visit to Hinjawadi.
Shiv Sena News: शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता; ठाकरेंची सेना मात्र जोशात

अनधिकृत बांधकामे पाडण्याचा आदेश

अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी हिंजवडीमधील समस्यांचा आढावा घेत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये त्यांनी सूचना करताना हिंजवडीची परिसराचे सर्वेक्षण करून अनधिकृत बांधकामे पाडण्याच्या सूचना केल्या होत्या. रस्त्याची कामे वेगाने करण्याचे निर्देश देखील दिले होते.

jit Pawar seen interacting with locals during his unexpected early morning visit to Hinjawadi.
Political Horoscope: मराठा आरक्षणावरून पुन्हा आंदोलनाची सुरुवात; नवीन युती, आघाडीच्या घोषणा होणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com