Thackeray Group: अजितदादा गटाला ठाकरेंचा दे धक्का; बडा नेता गळाला; शिवबंधन बांधलं!

Maharashtra Politics: संजोग वाघेरेनंतर आता शिरुरमध्ये...
Thackeray Group
Thackeray GroupSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्यामध्ये अजित पवार गटाला ठाकरे गटाने आणखी एक धक्का दिला आहे. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेले शैलेश मोहिते पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तळेगांव दाभाडे येथे युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत पक्ष प्रवेश केला आहे.

अजितदादा गटाचे नेते, आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे शैलेश हे पुतणे आहेत. मावळमधील अजित पवारांचे समर्थक संजोग वाघेरे यांनीही काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केला होता. मावळनंतर आता शिरुरमध्ये बडा नेता ठाकरेंच्या गोटात केल्याने अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जातो.

ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर शैलेश मोहिते म्हणाले, "मी राष्ट्रवादी काँग्रेसचा दोन वर्षांपूर्वीच राजीनामा दिला आहे. दिलीप मोहिते आमचे घरचे संबंध चांगले आहे,पण राजकारणात आमची वेगळी भूमिका आहे," महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांनीही ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर, मावळ लोकसभा मतदार संघात वाघरेंच्या रूपाने तर आता शिरूर लोकसभेत शैलेश मोहितेंच्या रूपाने ठाकरेंनी अजित पवार गटावर बाजी मारली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोण आहेत शैलेश मोहिते पाटील?

  1. अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत.

  2. राज्य राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

  3. माजी उपाध्यक्ष: महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस

  4. निरीक्षक: उत्तराखंड, झारखंड, छ्तीसगड, लक्षद्वीप

Thackeray Group
Ramesh Kadam: भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगवास झाला, तरीही रमेश कदमांची क्रेझ कायम!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com