Ajit Pawar : ...उलट भाजपवरील नाराजीचा फटका अजितदादांना बसला, रुपाली पाटलांनी सुनावले !

Rashtriya Swayamsevak Sangh Article : 'ऑर्गनायझर' या संघाचे मुखपत्रात एक लेख लिहिण्यात आला होता. त्यामध्ये अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याची टीका करण्यात आली होती.
Rupali Patil - Devendra Fadnavis
Rupali Patil - Devendra FadnavisSarkarnama

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'ऑर्गनायझर' या मुखपत्रातील लेखात करण्यात आली होती. त्यावरून महायुतीत जोरदार वादविवाद सुरू झाले आहेत.

दोन्ही पक्षाचे नेते यावरून एकमेकांवर टीकाटीपणी करत असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहरातील नेत्या रुपाली पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांमुळे भाजपचे नुकसान झाले नाही उलट भाजपवरील नाराजीचा फटकाच अजितदादांना बसला असल्याचे पाटील यांनी सांगितले.

राज्यात सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारला पाठींबा देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. तसेच पवार यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झालेल्या वरिष्ठ नेत्यांना विविध मंत्रिपदे देण्यात आली. अजित पवारांनी महायुतीबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने लोकसभेच्या निवडणुका शिंदे यांची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी एकत्रित येत महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढविली.

Rupali Patil - Devendra Fadnavis
RSS BJP Rift : भाजप अन् संघामध्ये नक्की काय घडतंय? भाजपचे प्रमुख पराभूत उमेदवार मोतीबागेत

या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मोठ्या प्रमाणात जाहीर सभा घेतल्या होत्या. मात्र असे असतानाही भाजपच्या उमेदवारांना अनेक जागांवर पराभव स्वीकारावा लागला. यावरून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुखपत्रातून भाजपच्या नेत्यांना प्रश्न विचारून सुनाविण्यात आले होते. 'ऑर्गनायझर' या संघाचे मुखपत्रात एक लेख लिहिण्यात आला होता. त्यामध्ये अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याची टीका करण्यात आली होती.

आरएसएसने केलेल्या या टीकेनंतर भाजपमधील काही नेत्यांनी हीच रि पुढे ओढत भाजपच्या स्थानिक नेत्यांवर टीकेची झोड उठविली होती.पुण्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या नेत्या रुपाली पाटील या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी मंगळवारी मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेत चर्चा केली. या चर्चेनंतर प्रसारमाध्यमांशी रुपाली पाटील यांनी संवाद साधला. अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस सोडून इतर कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्याला ऑफर दिली होती, मात्र आपण कोठेही जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Rupali Patil - Devendra Fadnavis
Bacchu Kadu : मुख्यमंत्र्यांना शह देण्यासाठी भाजपकडून कुरघोडी? बच्चू कडूंचा मोठा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, या टीकेवर बोलताना रुपाली पाटील म्हणाल्या, मतदारसंघातील नागरिकांची कामे करण्यासाठी शिंदे यांची शिवसेना,भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या माध्यमातून एकत्र आलेली आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या बैठकीत काय चर्चा झाली. ती त्यांची अंतर्गत बैठक आहे. परंतू अजितदादांना घेऊन त्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. उलट भाजपवरची जी नाराजी आहे, त्याचाच फटका अजितदादांना बसला असे म्हणणे योग्य ठरेल,अशा शब्दात रुपाली पाटील यांनी टीका करणाऱ्यांना सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com